सतिश कडार्ला
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा तालुक्यातील वनविभागाने सिरोंचा तालुकात लाकूड बीट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव संदीप राचर्लावार यांनी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे केली आहे.
मागील दोन वर्षांपासून सिरोंचातील लाकूड डेपोत जळाऊ लाकूड उपलब्ध नाही. मृत व्यक्तीवर अन्त्यसंस्कार करण्यासाठी यापूर्वी वनविभागातून अत्यंत कमी किमंतीत जळाऊ लाकूड उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी लाकडाचे बीट नाहीत. परिणामी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना महागडे लाकूड इतर नागरिकांकडून खरेदी करावे लागते. जंगलातून लाकूड आणतेवेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडल्यास तुरुंगाची हवा खावी लागते. जंगलाचे संरक्षण करण्यास वनविभागाबरोबरच सामान्य नागरिकांनीही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. त्यामुळे जंगलावर सामान्य व्यक्तींचाही अधिकार आहे. वनविभागाने पूर्वीप्रमाणे कमी किमतीत बीट उपलब्ध करून दिल्यास जंगलातील लाकडाची होणारी चोरी थांबण्यास मदत होईल. शासनाने नागरिकांना गॅस वितरित केले असले तरी गरीब नागरिकांना गॅस सिलेंडर भरणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बहुतांश नागरिक सरपणाच्या मदतीने पाणी गरम करतात. त्यांनाही लाकूड उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव संदीप राचर्लावार यांनी केली आहे आ गंभीर समस्या कडे वनविभागाने लवकरात लवकर लक्ष वेधून हा मागणी पूर्ण न केल्यास महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.