पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी देसाईगंज
दखल न्यूज भारत
देसाईगंज आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आरमोरी विधानसभा जिंकण्याच्या उद्देशाने लढणार असल्याची माहिती जिल्हा महासचिव तथा आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम यांनी दिली.
संपुर्ण महाराष्ट्रात ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात आरक्षण बचाव ही मोहिम सुरु असुन बहुजन समाजातील अनेक जातींचा या मोहिमेला पाठिंबा मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत संविधान बचाव हा मुख्य मुद्दा असल्याने आणि देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तानाशाही संपुष्टात आणन्याच्या उद्देशाने आंबेडकरी समाजाने भरभरुन कॉंग्रेस पक्षाला मतदान केले. मात्र कॉंग्रेस पक्षाने दिशाभुल केली.
महाविकास आघाडी सोबत युती नसतांनाही ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी नागपुर, सोलापुर, सातारा बारामती सह ७ जागांवर आपले उमेदवार उभे केले नाही.
मात्र अकोला मतदार संघात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून कॉंग्रेसने बाळासाहेबांना निवडुन येण्यासाठी उमेदवार उभे करायला नको होते.मात्र कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्या नंतरही प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पराभुत उमेदवाराची सांत्वन सभा घेतली म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांना संसदेत पोहचु द्यायचे नाही ही मानसिकता नाना पटोले यांनी प्रदर्शीत केली. हीच मानसिकता कॉंग्रेस ने बाबासाहेब आंबेडकरांविषयी बाळगली होती.आंबेडकरी समाज कॉंग्रेस पक्षाचा गुलाम नाही या समाजाचे आरमोरी विधानसभेत मोठे अस्तित्व आहे.
अनुसुचित जमातीसाठी ही जागा आरक्षित असल्याने या समाजाचे किमाण २० हजार मते घेणारा उमेदवार मिळावा याची चाचपणी सुरु असुन समाज बांधणी चे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
लवकरच उमेदवाराची घोषणा होणार असुन भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा रंगतदार सामना आरमोरी विधानसभा क्षेत्रात पहावयास मिळेल अशी माहीती वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा प्रमुख तथा जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम यांनी दिली.