प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी :- ऐन पावसाच्या दिवसात आरमोरी शहरातील रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले असल्याचे दिसुन येत आहे. सदर खड्यामध्ये पाणी साचलेले असून या खड्यांमुळे रस्त्यावर प्रवास करणे हे अवघड झाले असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील इंदिरा गांधी चौक, गडचिरोली रोड वरील जकात नाक्याजवळ, नवीन बसस्टँड, शक्ती नगर वार्ड, गुजरी वार्ड ते राम मंदिर पर्यंतचा रस्त्या मुख्य मार्केट लाईन असल्याने खुप मोठया प्रमाणात वाहनांची आवागमन दिवसभर चालुच असते तरी सबंधीत विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे.
आरमोरी शहर हे मुख्य बाजारपेठ तथा तालुक्याचे ठिकाण असुन परीसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात शहरात येत असतात. शहरातील संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून प्रशासन अपघात होण्याची वाट बघत आहे काय असा प्रश्न युवारंगचे संस्थापक तथा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राहुल जुआरे यांनी प्रसीद्धीपत्रकाच्या माध्यमातून केला आहे.
संबंधित विभागाने त्त्वरीत रस्त्यावरील खड्यांची दुरुस्ती करावी अन्यथा युवारंग तर्फे जनआंदोलन छेळण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.