सती नदी वरील पुल पाडल्याने पूला चा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने मालदुगी-वाघेडा-आंधळी-चिखली फाटा रोड तसेच खैरी-आंधळी-चिखली फाटा रोडचे डांबरीकरण करून द्यावे.. — अन्यथा येत्या ५ दिवसात शिवसेना ऊ.बा.ठा च्या वतीने चक्का जाम आंदोलन…

    राजेंद्र रामटेके 

ग्रामीण तालुका प्रतिनिधी 

   गडचिरोली :- कुरखेडा सती नदीवर नवीन पुल मंजूर झाल्याने गेल्या दोन महिन्या पूर्वी ऐन पावसाळ्याच्या तोंडा वर पुल तोडले आणि पुल बधकामास सुरवात केली. येण्या – जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात रपटा बनविला.

          पावसाळा लागल्याने नदीला पूर आले आनी रपटा वाहून गेला. मुख्य नेहमी रहदारी असणारा कोरची,देवरी, कोरची वरून शॉर्ट कट राजनांदगाव तसेच मालेवडा , सोनसरी वैरागड कढोली,रहदारी बंद झाली.

           सर्व चार चाकी, दुचाकी ,जड वाहने,मालदुगी,आंधळी, चिखली फाटा आणि दुसरा मार्ग खैरी, बेलगांव आंधळी,चिखली फाटा या रस्त्याने सुरू झाले. पूर्वीच जुना रस्ता असल्याने सतत वाहने जात असल्याने रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले. वाहनाने जात – येत असताना खड्डे वाचवनाच्या प्रयत्नात अपघात होऊ शकतो प्रसंगी एकधाच्या जीव ही जाऊ शकतो.

            या रस्त्याचे दुरुस्तिकरण व्हावे डांबरीकरण करण करण्यात यावे ही मागणी घेऊन शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कडे निवेदन दिले. परंतु अजूनही रस्त्याची दुरस्ती डांबरीकरण करण्या विषयी पाऊल उचलले नाही.तरी पुल तोडल्याने ही सर्व समस्या निर्माण झालेली आहे.याला कारणीभूत महामार्ग विभाग आहे आणि कांत्रटदार आहे.

            तरी मालदुगी,आंधळी,चिखली फाटा तसेच खैरी ते चिखली फाटा ह्या दोन्ही रोड वर त्वरीत डांबरीकरण महामार्ग विभाग किंवा कंत्राटदारांने करून द्यावे.येत्या पाच दिवसात डांबरीकरण काम सुरू न केल्यास शिवसेना (ऊ.बा. ठा.) च्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी दिला आहे.