सेंदूरवाफा येथे नव्या सत्रात विद्यार्थ्यांचे स्वागत…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सेंदूरवाफा १ येथे नवागतांचे प्रवेशोत्सव ( सोमवार ०१ जुलैला ) साजरा करण्यात आला. येथील सर्व शिक्षकवृंद शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेची पहिली घंटा वाजविण्यात आली.

           याप्रसंगी साकोली गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हरीश भलावी यांनी शाळेला भेट दिली. नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती महेश वाघदेवे, सदस्यगण बाळकृष्ण देशमुख, रविंद्र चौधरी सदस्य यांनीही नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

        आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक अर्जुन मेश्राम, शिक्षक सुरेश ठाकरे,दीपक वैरागडे, सहायक शिक्षिका उषा खेडीकर, मुन्नीताई कटरे, अलका करेले, अंजली राऊत, सविता ब्राह्मणकर, यांचे हस्ते मुलांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी हरीश भलावी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

         मध्यान्न भोजनात विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा देण्यात आल्या.