कृषी संजीवनी पखवाडा समापन माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा… 

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

            पारशिवनी::-दिनांक एक जुलै 2024 रोजी पंचायत समिती कार्यालय पारशिवनी च्या सभागृहात कृषी दिना निमिताने तालुका कृषी कार्यालय तर्के आयोजित कृषी संजीवनी पखवाडाच्या समापन आज येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय श्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

         या प्रसंगी कार्यक्रमात पंचायत समिती पारशिवनी ची सभापती सौ.मंगलाताई निंबोने यांनी उपस्थितांना वृक्षारोपण ही काळाची गरज असून कृषी क्षेत्रात विविध पूर्ण बाबींचा समावेश करून उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नशील असावे याबाबत मार्गदर्शन केले. 

         श्री सुरज शेडे तालुका कृषी अधिकारी पारशिवनी व कृषी अधिकारी श्री राजकमलजी डहाट व कृषी अधिकारी पंचायत समिती पारशिवनीचे श्री चंद्रकांतजी देशमुख यांनी स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांना कृषी दिन बद्दल मार्गदर्शन केले .

            यावेळी कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती म्हणून पंचायत समिती पारशिवणीच्या अध्यक्षा सौ मंगलाताई निंबोने, पंचायत समिती माजी उपसभापती श्री चेतनजी देशमुख,पंचायत समिती सदस्य श्री संदीपजी भलावी, श्री भुते,तसेच गटविकास अधिकारी श्री सुभाषजी जाधव, कृषी अधिकारी श्री राजकमलजी डहाट कृषी, सहायक गटविकास अधिकारी श्री उमेश नैताने, कृषी अधिकारी श्री चंद्रकांत देशमुख,मंडळ कृषी अधिकारी श्री प्रभाकर डी शिरपूरकर तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, प्रगतशील शेतकरी, कृषी विभागाचे व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण.बी.ठोंबरे कृषी सहायक यांनी तर आभार प्रदर्शन कृषी मंडळ अधिकारी श्री प्रभाकर डी शिरपूरकर यांनी केलं.

          मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करून वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

           कृषी संजीवनी पखवाडा समापन हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.