कोरची :- दि. १ जुलै २०२२ रोज शुक्रवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरची चे तालुकाध्यक्ष सियाराम हलामी, शहर अध्यक्ष अविनाश हुमणे, महिला तालुकाध्यक्षा गिरजाताई कोरेटी, रायुकाँ चे तालुका अध्यक्ष स्वप्निलभाऊ कराडे, रायुकाँ चे शहर अध्यक्ष चेतनभाऊ कराडे, जेष्ठ कार्यकर्ते आसारामजी सांडील, बस्तरजी हलामी, सुमनताई हलामी, विशालभाऊ जांभुळे, प्रशांतभाऊ साहारे, तसेच रुग्णालयातील परिचारीका व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.