धानोरा /भाविक करमनकर 

 

उत्तर धानोरा परीक्षेत्रातील मुस्का उपक्षेत्रात बांधोना गावातील श्रीमती. प्रेमीला शामराव किरंगे या महीलेस बिबट या वन्यप्राण्याने जखमी केले. दिनांक. 1/7/2022 रोजी बांधोना येथील महीला सकाळी 6 चे सुमारास शौचालयाकरीता जंगलात गेली असता जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट प्राण्याने सदर महीलेवर हल्ला केला. महीलेने प्रतीकार केला व सोबत असलेल्या 2 कुत्र्यांनी बिबट्यावर तुटुन पडले.त्यामुळे महिलेला सोडुन बिबट जंगलात पळून गेला. कुत्र्यामुळे प्रेमीला शामराव किरंगे या महीलेचे प्राण वाचले.

वसंत मेडेवार वनपरिक्षेत्र अधिकारी,कु.करेवार क्षेत्र सहाय्यक मुस्का,प्रवीण मेश्राम,विकास कुमरे वनरक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी महिलेची विचारपूस करून उपचाराकरीता प्रथमीक आरोग्य केंद्र आरमोरी येथे हलविले परंतु महिला गंभीर स्वरूपात जखमी असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले.जखमी महिलेस वसंत मेडेवार वनपरीक्षेत्र अधिकारी उत्तर धानोरा यांनी उपचाराकरीता सानुग्रह मदत केली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com