पारशिवनी :-पारशिवनी येथील वास्तव्यास आलेले व शांतिनिकेत पण अध्ययन मंदिर हिवरा बाजार येथे 35 वर्ष विद्यादानाचे कार्य करून ठराविक वयोमानानुसार 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झालेले शिक्षक गोपाल भैय्याजी कडू यांचा सहपत्नी सत्कार करून पुढील कार्यासाठी त्यांना आनंदीमुळे शुभेच्छा देण्यात आल्या.
शांतीनिकेतन अध्ययन मंदिर हिवरा बाजार येथे 26 जून 1987 ला शिक्षक पदावर नियुक्त झालेले व 35 वर्ष अध्यापनाचे कार्य करून 58 वर्ष पूर्ण करून वयोमानानुसार 30 जून 2022 ला सन्मानाने सेवानिवृत्त झालेले कडू गुरुजी यांना विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या निरोपिय कार्यक्रमात सह पत्नी सत्कार करून शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्था उपाध्यक्ष शेख सुभान अब्बास शेख, देवचंद कावळे, सहसचिव संचालिका श्रीमती लक्ष्मीबाई सुरेंद्रजी वाडीभस्मे, संचालक इरफान शेख, मुख्याध्यापक एस.व्ही.कळमकर, माजी मुख्याध्यापक आर.एस.पाणकावशे आदी उपस्थित होते.
संस्था अध्यक्ष व पदाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या हस्ते कडू गुरुजी यांच्या सह पत्नी शाल श्रीफळ व भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमाचे संचालन शिक्षक रामदास कोहळे यांनी अत्यंत प्रभावीपणे करून शिक्षक भगवान बिसने, संजय यादव ,विनोद देवगडे, सुरेंद्र ढोमणे,सौ भोजवंती कळमकर, सचिन महाजन ,देवीलाल शिवणे ,आदींनी शुभेच्छा देतांना कडू गुरुजी यांना आरोग्यवर्धक शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले.
सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ कडू यांनी आपल्या निवृत्ती भाषणातून सांगितले की, 35 वर्षाच्या समर्पित सेवेनंतर मी आपला शाळेचा निरोप घेत आहे.शिक्षक विद्यार्थ्यांसाठी पालकांपेक्षा कमी नसतो.माझे सहकारी शिक्षक मुख्याध्यापक व संस्था अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माझा गौरव होणे ही माझ्या उत्तम कार्याची पावती आहे।यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करा व प्रगती करा असा संदेश दिला.मी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात अग्रेसर होणार असल्याचे स्पष्ट केले कार्यक्रमाचे आभार शिक्षक विनोद भिवगडे सर यांनी केले.