पारशिवनी तालुक्या तिल पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री हरित क्रांती चे जनक स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषि दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.मीनाताई प्रफुलजी कावळे सभापती पंचायत समिती पारशिवणी यांनी भूषवले तसेच कार्यक्रमास मा.चेतनजी देशमुख उपसभापती पंचायत समिती पारशिवणी,श्री.कारेमोरे जि.प सदस्य,सौ.तुलसीताई दियेवार पं.स सदस्य,श्री.सुभाष जाधव गट विकास अधिकारी पं.स पारशिवणी,डॉ.ए.टी.गच्चे तालुका कृषि अधिकारी पारशिवणी,श्री.संजय सत्तेकार प्रगतशील शेतकरी तथा संसाधन शेतकरी,श्री.चंद्रकांत देशमुख कृषि अधिकारी पं.स पारशिवणी,श्री.जी.बी.वाघ मंडळ कृषि अधिकारी कन्हान व श्री.एस.आर शेंडे मंडळ कृषि पारशिवणी मान्यवर उपस्थित होते.कृषि दिनाचे औचित्य साधून पीक स्पर्धा विजेत्यांचा सत्कार करण्यात आला व तसेच त्यांनी ते उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून राबवित असलेले नाविन्यपूर्ण प्रयोगाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच संसाधन शेतकरी श्री.संजयजी सत्तेकार यांनी तूर पीकात उत्पादन वाढीच्या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,श्री.नारायण कुंभलकर यांनी भात पीक उत्पादन वाढीच्या संदर्भात मार्गदर्शन केले,श्री.विकास गुजरमाळे यांनी शेती पूरक व्यवसाय शेळी पालन बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,महिला शेतकरी सौ.उमा जुट्टीगा यांनी लघु प्रक्रिया उद्योगाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व श्री रामजी लांजेवार यांनी जैविक शेती बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच डॉ.ए.टी.गच्चे ता.कृ.अ पारशिवणी यांनी कृषि संजीवनी मोहिमेदरम्यान राबविण्यात आलेल्या सर्व बाबींवर प्रकाश टाकला. उपस्थित मान्यवर यांनी शेती विषयक विविध विषयांवर शेतकऱ्यांना संबोधित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ए.एन.देशमुख यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्व अधिकारी तथा कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमास मोठया संख्येने प्रगतशील शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com