वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम / प्रतिनिधी स्थानिक विद्या भारती महाविद्यालयात महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ शाखा करण्याचे वतीने तालुक्यातील गुणवंत विध्यार्थी आणि त्यामागे असलेल्या कष्टकरी आई वडील पालकांचा सत्कार नुकताच संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बहुजन पत्रकार संघाचे तालुका कोषा अध्यक्ष प्रा.सी.पी.शेकूवाले होते तर प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून उपथिस्तानी दहावी बारावीनंतर पुढे काय याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी तहसीलदार धीरज मांजरे गट शिक्षण अधिकारी श्रीकांत माने वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे याचे सह प्राध्यापक डॉ.अशोक जाधव एल आय सी चे विकास अधिकारी राहुल महात्मे सामाजिक कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांनी केले दहावी बारावी नंतर काय यावर मार्गदर्शन यावेळी मंचावर प्राचार्य देशमुख मैडम,बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ इंगोले तालुका उपा अध्यक्ष प्रा.डॉ.दिनेश रघुवंशी उपस्थित होते . ज्यांचे जन्म दिवसाच्या निमित्ताने या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
बहुजन पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आरीफ भाई पोपटे,जेष्ठ सभासद डीगाबर सोनोने ,दामोधर जोधलेकर याचा जन्म दिवस सर्व विध्यार्थी ,पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर यांनी शुभेच्छा देऊन साजरा केला.त्या नंतर गाव खेड्यातील विध्यार्थी व त्यांना घडविण्यासाठी राबणारे आई वडील याचा मान्यवरांच्या उपस्थित शाल एक रुक्ष ट्रॉफी ,प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला यात तालुक्यातून ६०,७० विध्यार्थी व त्याच्या आई वडिलांनी सत्कार स्वीकारला…यावेळी तहसीलदार धीरज मांजरे यांनी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची कार्य करण्याच्या कार्य प्रणालीचे कौतुक केले व अशा कार्याने राज्य चालविणारे प्रशासक निर्माण होतात असे सांगून अनेक विध्यार्थी निर्माण करताना अनेक अडचणीचा सामना करीत आपल्या गरजांना तिलांजली देत आपल्या मुलाच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणाऱ्या आई बाबाचा सत्कार करताना आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना कायम पाठीशी राहण्याचे सांगितले. यावेळी करोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्र दिवस राबणारे रमेश देशमुख यांचा करोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला…
महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आरीफ पोपटे ,जेष्ठ सभासद तथा दैनिक सम्राट चे तालुका प्रतिनिधी डीगांबर सोनोने, व गावाकडच्या बातम्या याचे जिल्हा प्रतिनिधी दामोधर जोधळेकर यांचा जन्म दिवसाचे औचित्य साधून कारंजा लाड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी असलेल्या कष्टकरी आई वडिलांचा सत्कार करून त्याच्या कष्टाला व त्याच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याने अनेक आई बाबा नी पत्रकार संघाचे आभार व्यक्त करीत भावना व्यक्त केल्यात.. या कार्यक्रमात सामाजिक उत्तरदायित्व समजून करोना काळात कार्य करणाऱ्या चा सत्कार करण्यात आल्याने महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्याचा जन्म दिवस हा संघाचे वतीने गुणवंतांच्या नावे त्याचा सत्कार करून साजरा करण्याचा करण्याचा संकल्प करून अतिशय मोठ काम केलं गेलं हा पत्रकार संघ करीत असलेली कमाची सर्व उपस्थितांनी प्रसन्श्या केली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ इंगोले यांनी केले तालुका संघटक आभार आशिष धोगडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषा नाईक कालुभाई तवनगड,दिलीप पाटील, गालिफ पटेल,मोहम्मद
मुन्नीवाले राजेश वानखेडे, मयूर राऊत,गणेश बागडे,पवन कदम,विलास खपली, महादेव कठोले,यांचेसह सर्व पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले .
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत