खेड (वार्ताहर)
महाकवी कुलगुरू कालिदास हे एक उत्कृष्ट नाटककार होते शिवाय संस्कृत विषयात विद्वान होते त्यांनी भारतातील प्राचीन दर्शन आणि पौराणिक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून या आधारे सुंदर कथा लिहल्या अलंकारयुक्त सुंदर आणि सरळ भाषेकारीता ते ओळखले जायचे त्यांना शेक्सपियर ऑफ इंडिया या नावानेही ओळखले जायचे शालेय जीवनात संस्कृत भाषेतील त्यांच्या कथा आणि नाटकांमधील बोध विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे .शिक्षणातून संस्कृत कला जपण्याचा विद्यार्थ्यांनी पुढे अधिक प्रमाणात चांगला प्रयत्न केला पाहिजे अशा शब्दात संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ.प्रतीक्षा पराग मिर्लेकर यांनी संस्कृत भाषेत मुलांना संबोधित केले .महाकवी कुलगुरू कालिदास दिन गुरुवारी खेड शहरातील एल.पी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे स्कूलच्या संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ.प्रतीक्षा मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला .आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदात सहभाग घेतला होता.
महाकवी कुलगुरू कालिदास यांच्या प्रतिमेला श्री.काळे सर यांनी पुष्पहार घालून वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या वेळी एल्. पी. प्रशालेत महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला. कालिदास यांना संस्कृत कवींमध्ये शिरोमणी म्हटले जाते. शाकुंतल नाटक, कुमारसंभव, मेघदूत, रघुवंश ही त्यांची महाकाव्ये याप्रसंगी प्रशालेच्या संस्कृत शिक्षिका सौ. प्रतीक्षा मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी संस्कृत भाषेतून कालिदास यांची माहिती, कविता, समूहगीत सादर केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब भगत पर्यवेक्षक श्री. चव्हाण सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. काळे , श्री. जोशी , प्रतीक्षा मिर्लेकर , प्रसिद्धी प्रमुख सौ. चिंगळे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्कृत विषयाचे शिक्षक सौ .प्रतीक्षा मिर्लेकर आणि विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो : महाकवी कुलगुरू कालिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या वेळी मुख्याध्यापक बाळासाहेब भगत,संस्कृत विषयाचे शिक्षक प्रतीक्षा मिर्लेकर आणि शिक्षकवर्ग छायाचित्रात दिसत आहेत