युवराज डोंगरे/खल्लार

आगामी होऊ घातलेल्या जि प व पं स निवडणूकीसाठी दर्यापूर तालुक्यातील आंबेडकरी विचारधारेच्या सर्वच पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी व नेहमी होत असलेल्या मतांचे विभाजन टाळावे असे मत चंडिकापुर ग्रा पं चे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजुभाऊ धुरंदर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे

दर्यापूर तालुक्यात जि प चे 5 व पं स चे 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत तालुक्यात यापूर्वी जि प चे 4 व पं स 8 सदस्य दर्यापूर तालुक्यातुन निवडले जात होते.तालुक्यातील ग्रामिण भागात बौद्ध मतदार हि रिपाई गवई गट, आठवले गट, पि रि पा, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, खो रि पा व अन्य गटात व पक्षात विभागला आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व इतर पक्षातही बौद्ध मतदार आहेच.त्यामुळे येणाऱ्या जि प व पं स निवडणूकित जर आंबेडकरी विचारांचे सर्व पक्ष व गट एकत्र आल्यास बौद्धांच्या मतांचे होत असलेले विभाजन थांबेल व याचा फायदा हा गटातटात विभागलेल्या पक्षांना होऊन त्या पक्षांचे उमेदवार विजयी होतील.त्यामुळे आगामी जि प व पं स निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढावावी असे मत राजुभाऊ धुरंधर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com