कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे १ मई महाराष्ट्र आणि कामगार दिवस निमित्य भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य हेल्थ कार्ड शिबीर कार्यक्रमाचे आयोजन नवीन ईमारत कन्हान – पिपरी नगर परिषद येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित अरिहंत हाॅस्पीटल सुपर स्पेसिलिटी सेंटर नागपुर चे डॉ. रजत जैन , कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर , कन्हान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर , कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम राहाटे सह आदि मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करित पुजन आणि दीप प्रज्वलन करुन शिबीर कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . शिबीरात अरिहंत हाॅस्पीटल सुपर स्पेसिलिटी सेंटर नागपुर चे डॉ. रजत जैन , डॉ.नईम शेख , सिस्टर संध्या करंडे व त्यांचा चमुंच्या सहकार्याने एकुण ११० नागरिकांची बीपी , शुगर , ईसीजी , दमा , अस्थमा सह आदि विविध बीमारींची तपासणी करण्यात आली . तसेच जीवनदायी विकास फाऊंडेशन चे अमित लाडेकर , सपना चंदनखेडे , प्रणाली सातारकर , प्रतीक सहारे व त्यांचा चमुंच्या सहकार्याने एकुण १६० नागरिकांचे आरोग्य हेल्थ कार्ड बनवुन वाटप करण्यात आले . यावेळी शिबीर कार्यक्रमात नगर परिषद सफाई कर्मचारी कामगारांचा , अरिहंत हाॅस्पीटल सुपर स्पेसिलिटी सेंटर नागपुर चे डॉ.रजत जैन , डॉ.नईम शेख , सिस्टर संध्या करंडे आणि त्यांचा टीम चा व जीवनदायी विकास फाऊंडेशन चे अमित लाडेकर , सपना चंदनखेडे , प्रणाली सातारकर , प्रतीक सहारे व त्यांचा टीम चा मान्यवरांचा हस्ते वृक्ष , पेन आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी वरिष पत्रकार कमलसिंह यादव , कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव सुनिल सरोदे , येसंबा ग्रामपंचायत उपसरपंच धनराज हारोडे , सहादेव मेंघर , वामन देशमुख , चंद्रशेखर बावनकुळे , राजेश पोटभरे , रतिराम सहारे , नेवालाल पात्रे , रविंद्र दुपारे , पंकज रामटेक , संजय चहांदे , प्रदीप बावने , सुनिल भोगे , संदीप परते , शंकर इवनाते , हरिष तिडके , चिंटु वाकुडकर सुरज वरखडे , पंचम सलामे , प्रशांत मसार , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , कार्याध्यक्ष योगराज आकरे , उपाध्यक्ष भुषण खंते , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव अरविंद कटाले , कोषाध्यक्ष प्रकाश कुर्वे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , शुभम बावनकर , शाहरुख खान , अनुराग महल्ले , रवि महाकाळकर , पुरुषोत्तम ऊके , विलास दुधबावने , विनोद खडसे , प्रशांत केवट सह आदि ने सहकार्य केले .