दिक्षा कऱ्हाडे
मुख्य कार्यकारी संपादक
गरीबी अशी व्यथा आहे की धड जगू देत नाही आणि चांगल्याने मरुही देत नाही.तद्वतच अनेक नावबोटांसाठी सर्व प्रकारचे मार्ग खूले करून देणारी एक प्रकारची सटवीच..
चिमूर तालुक्यातंर्गत मौजा नेरी येथील रहिवासी तथा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे यांच्या हळद पिसाई चक्कीच्या पट्यात तेथीलच विलास वनकरचा हात सापडल्याने चेंदामेंदा झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात विलास बनकर जाग्यावरच गंभीर अस्वस्थ झालाय.
हातातून बाहेर जाणाऱ्या रक्ताचा प्रवाह हा थांबल्याने थांबत नव्हता,तरीही विलासला दिलासा देण्यासाठी किंवा उपचाराकरिता नेण्यासाठी कुणीही अपघात स्थळी नव्हते याचे आश्चर्यच म्हणावे लागेल..
पत्नी सपनाला पतीच्या अपघात घटनेची माहिती कळताच तीने धावतपळत चक्की गाठली आणि तशाच स्थितीत आॅटो करून अपघातग्रस्त पतीसह चिमूर गाठले व चिमूर वरुन बसचा प्रवास करीत चंद्रपूर गाठले आणि चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले,उपचार सुरू झाले व सुरु आहेत..
त्या माऊलीला माहिती नाव्हते की चंद्रपूरला गेल्यावर औषधांचा व इतर खर्च किती येवू शकतो.केवळ दिड हजार रुपये होते तिच्याकडे.ते सर्व रुपये आता संपले असून पुढील उपचारासाठी तिच्याकडे सध्या रुपयेच नाहीत.
पती विलासला रक्ताची गरज होती,रक्त देण्यात आले.आता त्याच्या औषधोपचारासाठी व इतर खर्चासाठी रुपयांची अतिशय निकडीची गरज आहे.”कोणी हृदयस्पर्शी मायाळू दानदाता असल्यास त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे जाऊन त्यांना यथाशक्ती आर्थिक मदत करावी अशी आर्त हाक पत्नी सौ.सपना विलास बनकर हिची आहे.
कुणी तरी मदत करेल या आशेने ती माऊली दानदात्याकडे आशाळभूत नजरेने दररोज बघते आहे.समस्यातंर्गत तीची दुःखद् व्यथा तिलाच माहीत…
म्हणूनच त्या माऊलीच्या समस्यातंर्गत दुःखाला कुणी तरी समजून घेणार काय?
“नेरी वासीयांनो!,तुम्ही तरी विलास बनकरला आर्थिक मदत करण्यासाठी मदतीचे हात पुढे करणार काय?
त्यांचा संपर्क क्रमांक :- ७७९८७७१७८४ असा आहे..