ले-आऊट च्या नियमाप्रमाणे सोडलेल्या खुल्या 30 फूटाच्या रोडवर अतिक्रमन करुन करण्यात आलेले मंदीराचे बांधकाम थांबविण्यात यावे…. — आरमोरी नगर परिषद मुख्याधिकारी यांना ले-आऊट धारकांकडून विनंती अर्ज…

ऋषी सहारे 

  संपादक

आरमोरी :- नामे शैलेश तुलाराम रामटेके, वय 37 वर्ष, मु.पो.ता. आरमोरी ( गायकवाड चौक ) प्रभाग क्र.5, यांच्या मालकीचे ले-आऊट 7/12 नं 1320/1 असून गैरअर्जदाराचे प्लाट नं. 5 आराजी 220.18 चौरस फूट असून या प्लाटला लागूनच ले-आऊट पाडतांना 30 फूट रुंदीचा रस्ता सर्वाच्या वाहतूकीसाठी सोडला होता. परंतू गैरअर्जदाराने त्याचे वाहने ठेवण्यासाठी कच्चा रोड तयार करुन सन 2022 ला अतिक्रमण केले होते. याची रितसर तक्रार ले आऊट मालकांनी दिनांक 06/09/2022 ला आवक जावक कार्यालय नगर परिषद ला दिली होती.

        पण त्यावेळी नगर परिषदेने गैरअर्जदारा विरोधात कोणतीच कारवाई केली नसल्यामूळे गैरअर्जदाराने पुन्हा रोडवर छोट्या मंदीराचे बांधकाम करुन व सभोवताल जाळीचा कुंपन करुन अतिक्रमन वाढवले आज मंदीर केला उद्या मोठा मंदीर बांधून पूर्ण रस्ताच गिळंकृत करण्याचा विचार दिसतो त्यामुळे ले-आऊट च्या नियमाप्रमाणे सर्वांसाठी सोडलेल्या 30 फूट रुंदीचा रस्ता आपण पुन्हा गैरअर्जदाराचे अतिक्रमन काढून सर्वांसाठी जाण्या – येण्यासाठी रस्ता मोकळा करुन द्यावा. व संबंधित अतिक्रमन धारकांना समज देत योग्य मार्ग काढुन रोडसाठी खुली ठेवण्यात आलेल्या जागेवर रोडवर बनविण्यात यावा अशी मागणी ले-आऊट मालकाने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना तक्रार अर्जातुन केली आहे.

कोट

सबंधित गैर अर्जदार यांना नोटीस व समझ देऊन अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू असून लवकरच अतिक्रमण काढल्या जाईल.

      माधुरी सलामे

मुख्याधिकारी नगरपरिषद आरमोरी