रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर:-
भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील जगदिश आनंदराव रामटेके यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
नियुक्ती करताना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी म्हटले आहे की,भारतीय शेतकरी संघटनेची रुपरेषा समोर ठेऊन शेतकरी आणि मजुरांची लाढाई पुर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने लढण्यास सुचित केले आहे.तद्वतच संस्थेसाठी कर्तव्यदक्ष असणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.
भारतीय शेतकरी संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जगदीश रामटेके यांचे,शैलेश ठवरे,नरेश गजभिये,विलास मेश्राम,विनोद बोरकर,पंकज रामटेके,दिनेश बोरकर,काजल ठवरे,ताई ठवरे,रेखा चव्हाण यांनी मनःपुर्वक अभिनंदन केले आहे.