निलय झोडे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथील प्राध्यापक बी.पी.बोरकर सर हे नियत वयोमानाने कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्या प्रित्यर्थ विद्यालयातर्फे सेवानिवृत्ती सपत्नीक सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ.आर.बी. कापगते मॅडम तसेच प्रमुख अतिथी म्हणून के.जी.लोथे सर, माजी प्रा. व्ही.बी. काशीवार सर, एम.एम. कापगते सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सत्कारमूर्ती प्राध्यापक बी.पी.बोरकर सर व त्यांच्या सपत्नीक यांचा शाल व श्रीफळ देऊन विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. के.जी. लोथे सर ,प्रा. सुनील कापगते ,प्राध्यापिका एस.एन. गहाणे मॅडम, के.एम.कापगते कु. एस. वाय. करा-डे यांनी बोरकर सरांनी केलेल्या सेवेचा व त्यांच्या कार्याचा गुणगौरव करीत असताना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचा काळ सुखी- समृद्धी ,आनंदाने जावो व त्यांना चांगले आरोग्य लाभो यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, नंदलाल पाटील कापगते यांच्या आशीर्वादाने मला नोकरी मिळाली व त्यांचे मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने मी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक पदाची सेवा यशस्वीरित्या पार पाडू शकलो. यशस्वी होण्यासाठी सहकाऱ्यांचे विचार त्यांचे सहकार्य मिळणे अतिशय महत्त्वाचे असते. माणसाने आपल्या जीवनात सतत सत्य आचरणात आणून चांगले कर्म करावे असे त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले.
प्रा.बि.पी.बोरकर सर हे अतिशय मनमिळावू व्यक्ती असून आपल्या शालेय कामात अत्यंत तरबेज व वेळेवर निर्णयक्षमता आणि हजारजबाबीपणा असे व्यक्तिमत्व असून साधी राहणे व उच्च विचार असलेले .अशा व्यक्तींची विद्यालयाच्या प्रगतीसाठी आवश्यकता आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सौ आर. बी.कापगते मॅडम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन डी.एस.बोरकर सर यांनी तर आभार प्रदर्शन डि. डि. तुमसरे सर यांनी केले.
सरत्या शेवटी कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात येऊन स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.