शिरूर लोकसभेची निवडणूक ही जनतेने हातात घेतली आहे :- डॉ.अमोल कोल्हे…

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

आळंदी : शरद पवार यांनी मला 2019 मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर गेली पाच वर्षाच्या सातत्याने लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो. त्यातील काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो. मला वाटतं की, हा पुन्हा शरद पवार यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे, हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, शिरूर लोकसभेची निवडणूक ही जनतेने हातात घेतली असल्याचे शिरुर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

          शिरुरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून खेड तालुक्यातील गावभेट भेट दौऱ्यावर आले असताना कोल्हे यांनी आळंदी येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.

          यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेभराड, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, सुधीर मुंगसे, राहुल गोरे, बबनराव कुऱ्हाडे, डॉ.मनोज राका, सोमनाथ मुंगसे, विलासराव घुंडरे, उत्तम गोगावले, विलासराव कुऱ्हाडे, अविनाश तापकीर, नंदकुमार वडगावकर, रमेश गोगावले, दिलीप कुऱ्हाडे, आनंद मुंगसे, प्रकाश घुंडरे, सुरेश दौंडकर, अनिता झुजम, सतीश कुऱ्हाडे, आशिष गोगावले, बाबुलाल घुंडरे तसेच मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

              आळंदीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून अधिकचा पाणीपुरवठा कसा होईल, तसेच इंद्रायणी मेडीसीटी, इंद्रायणी प्रदुषण, तरुणांची बेरोजगारी, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव यावर नक्की प्रयत्न करणार असल्याचे डॉ.कोल्हे यांनी सांगितले आहे.