पोलीस बॉईज असोसिएशन प्रसिद्धी प्रमुख व विदर्भ उपाध्यक्ष पदी प्रकाश साजनदास उदासी यांची नियुक्ती…

  प्रेम गावंडे

   उपसंपादक

दखल न्युज भारत

           पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या अनुमतीने दिनांक 02 / 04 / 2024 रोजी यवतमाळ येथील रहिवासी असलेले प्रकाश साजनदास उदासी यांची पोलीस बॉईज असोसिएशन प्रसिद्धी प्रमुख व विदर्भ उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

            प्रकाश साजनदास उदासी यांनी या अगोदर पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख यवतमाळ जिल्हाध्यक्ष पद भूषविले आहे. त्यामुळे त्यांनी आजवर त्यांनी केलेली कामे पाहता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे व महाराष्ट्र प्रदेश संघटक शाहेद सय्यद यांनी प्रकाश साजनदास उदासी यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून व विदर्भ उपाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.

             प्रकाश साजनदास उदासी यांच्या निवडीबद्दल संपूर्ण यवतमाळ जिल्हा पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.