गावकऱ्यांचा लोकसभा निवडणूकीत बहिष्कार…  — विघुत लाईन समस्या सुटणार नाही तो पर्यत कोणत्याही पक्षाची गाडी फिरु देणार नाही :- गावकऱ्यांचा इशारा..

ऋषी सहारे

   संपादक

   ‌‌‌‌‌ तालुक्यापासून 9 कि.मी.अंतरावर मौजा ‌ बेतकाठी येथे 31 मार्चला सरपंच कुंती हुपुंडी यांच्या अध्यक्षतेखाली गावकरी लोकांनी बैठक घेऊन कोणत्या राष्ट्रीय पक्षाची गाडी फिरणार नाही असा एक मताने ठराव करण्यात आले.

           कोणीही लोकसभेचेच्या उमेदवार यांना मतदान करणार नाही.असा गावकरी लोकांनी एक मत व्यक्त केला आहे. या सारखे‌ 29 ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच सदस्य, शेतकरी परिषदचे पदाधिकारी यांनी 31 माचऀ 2024 पर्यंत प्रशासनला विघुत लाईन समस्या तात्काळ सोडवावे अन्यता लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकु असा इशारा गावकरी लोकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून दिला होता. 

  ‌‌‌‌‌‌‌ ‌‌ प्रशासन कोणत्याही प्रकारची समस्या सोडवली नाही त्या बेतकाठी सरपंच,सदस्य, माजी सरपंच गावकरी लोकांची उपस्थित होते. 

‌ ‌सरपंच कुंदा हुपूंडी माजी सरपंच सुरेश काटेंगे, रामकुमार नायक,तीलक सोनवानी, संतोष सर्पा, उपसरपंच कावळे,व गावकरी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.