
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी...
चिमूर बस्थानकात अतिक्रमण करून व्यवसाय सुरु आहेत.बस स्थानक परिसरातील वाणिज्य आस्थापनाचे टेंडर विभाग नियंत्रक राप चंद्रपूर यांचे अधिकारात काढले.
त्यात अटी शर्थी क्रमांक 24 यात विभाग नियंत्रक यांनी ठरवून दिलेले पदार्थ,वस्तू विक्रीचे अधिकार ठरवून दिलेले आहेत.
प्रत्येक वाणिज्य आस्थापनेस जागा ठरवून दिलेली आहे.वरील माहिती,”माहिती अधिकारात मिळवून घेतल्या नुसार आहे.परंतु चिमुर बस स्थानकातील वाणिज्य आस्थापनेशी सलोख्याचे संबंध ठेऊन आर्थिक हीत जोपसण्याचे कार्य बस स्थानक प्रमुख तथा वाहतूक निरीक्षक वैभव धाडसे, सूरज मुन करीत असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे यांनी केला आहे.
बस स्थनकातील वाणिज्य आस्थापनेस 10 बाय 10 ची जागा नेमून दिली असतांना व कोणते खाद्य पदार्थ विक्री करता येतात याची नियमावली ठरवून दिली असतांना याकडे दुर्लक्ष करून,नियम बाह्य विक्री व जागा अतिक्रमण करण्यास मदत करीत आहेत,यात चिमूर आगार प्रमुख यांचा आर्थिक लाभ दिसतो आहे.
तसेच स्नॅक्स बार या आस्थापनेस पूर्ण पणे मदत करीत असून त्यांचे आस्थापणे बाबतचा अहवाल खोटा व चुकीचा पाठविला आहे.
वरिष्ठांचे लक्षात येण्या पूर्वीच स्नॅक्स बार आस्थापना धारकांस वरिष्ठ येणार याची पूर्व कल्पना दिली जाते.स्नेकबार धारकांनी चणा रस्सा,समोसे,आलूबोण्ड,वडे,भजे,पुरी भाजी अशी अनेक पदार्थ विक्रीचे बोर्ड लावून टेबल खुर्ची स्टील प्लेटा,पाण्याचे कॅन ग्लास ठेऊन उपहार गृह चालवीत आहे.
तसेच बस स्थानक परिसरात बाजार भरवून प्रवाशांना त्रास होईल असे कृत्य चालवलेले आहे.
सर्व बाबतीत वरिष्ठठांना प्रत्यक्ष भेटून व लेखी तक्रारी करून सुद्धा दखल घेतली जात नाही.अधिकारी हे सांगतात की राजकीय नेते दबाव टाकत असल्याने आम्ही कारवाही करू शकत नाही,असे बोलून दाखवतात.
यामुळे कारवाही करायची किंवा नाही आम्ही ठरवू असेही बोलून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखविले आहे.त्यामुळे वरिष्ठांनी तातळीने दखल घेऊन कारवाही करावी.
तसे न झाल्यास विभाग नियंत्रक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करावे लागेल.यास चिमूर व चंद्रपूर राप कार्यालय जबाबदार राहील याची नोद घ्यावी असे विलास डांगे यांचे मत आहे.