भामोद येथे कबड्डीचे सामने संपन्न…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

         दर्यापूर तालुक्यातील भामोद दि. 1मार्च रोजी कबड्डीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

           पहिले बक्षीस 31हजार रुपये सुभाषराव बळवंतराव पावशे माजी पोलीस पाटील यांच्या तर्फे, दुसरे बक्षीस 21 हजार रुपये ओम प्रकाश शिंदे व वासुदेव वाघमारे श्री शिवाजी हायस्कूलचे माजी कर्मचारी, तिसरे बक्षीस 11 हजार रुपये सुनंदाताई देशमुख यांच्या स्मरनार्थ छोटू देशमुख यांच्यातर्फे, चौथे बक्षीस 11000 रुपये दिवंगत चंद्र भागाबाई श्रीराम गावंडे यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान विनोद गावंडे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते.

           उद्घाटन सुभाषराव बळवंतराव पावशे माजी पोलीस पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभांगी रामजी ठाकरे सरपंच ग्रामपंचायत भामोद प्रमुख पाहुणे सुरेश कात्रे, कैलास अगळते, ग्रामपंचायत सदस्य जयश्री नंदकिशोर सावळे, ओम प्रकाश शिंदे, जयप्रकाश देशमुख, छोटू देशमुख,गजानन सावळे, मंगेश मेहरे,संजय काळबांडे, प्रशांत एकनाथ काळे, सुनिल बसवंत शिरसाट,नंदकिशोर सावळे, विनोद गावंडे, तसेच अन्नदाते नंदकिशोर सावळे मंगेश मेहरे सुनील शिरसाट जयप्रकाश देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

         अंतिम सामन्यांचे बेस्ट रेडर यांचे बक्षीस तीन हजार शंभर रोख श्रीकांत काळे यांच्या स्मरणार्थ, प्रशांत काळे यांच्याकडून तसेच बेस्ट पकड 3100 गजानन सावळे यांच्यातर्फे देण्यात आले.

          कार्यक्रमाचे संचालन अर्जुन नवले यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सुधाकर जायले यांनी केले.