
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : ओळख ज्ञानेश्वरीच्या उपक्रमाचे कौतुक करत सदर उपक्रम हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातील मूल्य शिक्षणात घेण्याबाबत विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आळंदी येथे दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, व ओळख श्री. ज्ञानेश्वरीची परिवाराकडून शालेय विध्यार्थ्यांच्या मूल्यसंवर्धनासाठीची ओळख श्री.ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा या दोन पुस्तकांची निर्मिती करण्यात आली असून या पुस्तकांचे प्रकाशन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील सर्व अभंग महाराष्ट्र शासन ई बुक, ऑडिओ स्वरूपात आणणार असून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानच्या जागेतील विकास आराखड्यासाठी देखील शासन निधी देणार आहे. तसेच येत्या काळात राज्य शासनातर्फे कीर्तन महोत्सव देखील आळंदीत राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, डॉ.भावार्थ देखने, माजी विश्वस्त अभय टिळक, डॉ.नारायण महाराज जाधव, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शहरप्रमुख राहुल चव्हाण, राम गावडे, चैतन्य महाराज लोंढे, ॲड.विष्णू तापकीर, सुभाष महाराज गेठे, भागवत महाराज साळुंके, श्रीधर घुंडरे, प्राजक्ता हरफळे, नरहरी महाराज चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.