भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधि
श्री जी सी पाटील मुनघाटे महाविद्यालयात रा से यो विभागाद्वारे तहसील कार्यालय धानोरा चे वतीने आलेल्या सुचनेव्दारा भारत निवडणूक आयोगाचे सुचनेनुसार निवडणूक साक्षरता मंडळाचे सक्षमीकरण ,मतदार प्रचार प्रसार करण्याकरिता कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ पंकज चव्हाण अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच प्रा डॉ वीणा जंबेवार ,प्रा डॉ गणेश चुदरी ,प्रा डॉ राजू किरमिरे, प्रा.ज्ञानेश बनसोड मंचावर विराजमान होते.लोकशाही जिवंत आणि जागृत ठेवायची असेल तर सुजाण नागरिक गरजेचे आहे.आणि या करिता निवडणूक निःपक्षपाती होणे गरजेचे आहे .आणि ही संपूर्ण जबाबदारी सुजाण नागरिकांची गरज आहे असे मत मुख्य मार्गदर्शक प्रा डॉ गणेश चुदरी यांनी केले.
लोकशाहीत आवडीनुसार मत देण्याचे स्वातंत्र्य आहे आवडीचे उमेदवार नसल्यास नोटा हा पर्याय देखील उपलब्ध आहे असे प्रा डॉ आर पी किरमिरे यांनी सांगितले. महिलांच्या सशक्तिकरण करण्यासाठी निःपक्षपाती निवडणुका अत्यंत गरजेचे आहे असे प्रा डॉ विना जम्बेवार यांनी असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या विविध प्रश्नाचे निराकरण करण्यात आले व निवडणुका जनजागृती करण्यासाठी घोषवाक्य चे सामूहिक घोषणा देण्यात आल्यात. कार्यक्रमाचे संचालन रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी केले तर संचालन प्रा डॉ प्रियंका पठाडे यांनी केले कार्यक्रमास प्रा. तोंडरे,प्रा. गोहणे, प्रा. भैसारे, प्रा.पुण्याप्रेडिवार,प्रा. वाळके, प्रा. धावनकर इत्यादी सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते….