कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-
“शासन आपल्या दारी,च्या धरतीवर “दवाखाना आपल्या दारी” उपक्रमा अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील घाटपेंढरी येथे आज २ मार्च रोजी शिबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या “दवाखाना आपल्या दारी” मोहीमे अर्तगत पारशिवनी तालुक्यातील घाटपेंढरी (पारशिवनी) येथे आज शनिवारी आरोग्य तपासणी करण्यात आले.या शिबिरातंर्गत घाटपेढरी गावात ११० रुग्णाची तपासणी करून मोफत औषध दिली व आयुष्यमान भारत कार्ड- बवविन्यासाठी ११८ नागरिकाचे कार्ड तयार करण्यात आले.अशा अनेक गावांतील लाभार्थींनी लाभ घेतला.
“दवाखाना आपल्या दारी” उपक्रमामध्ये डॉक्टरांची टीम गावो-गावी जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी,दिव्यांग तपासणी,सिकलसेल तपासणी, आयुष्यमान भारत कार्ड व एक्स-रे व्हॅन इत्यादी तपासणी करणार व त्यांना मोफ़त औषधी देण्यात येणार आहे.अशी माहीती टिम प्रमुख डाॅक्टर यांनी दिली.