भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधि
मुरुमगाव येथील सार्वजनिक स्टेडियम वर सतत आठ दिवसीय राज्य व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव याचा हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम सार्वजनिक क्रीडा मंडल मुरुमगाव तर्फे आयोजित करण्यात आले असून या क्रिकेट चषक स्पर्धेत मंडळा तर्फे प्रथम क्रमांक पारितोषिक 21021/- द्वितीय क्रमांक पारितोषिक 15015/- व तृतीय क्रमांक पारितोषिक 10010/- या प्रमाणे ठेवण्यात आले होते.
या आंतरराज्य क्रिकेट चषकात जवळ चे राज्य छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्य़ातील एकूण 17 टिम च्या खेळाडूंनी सहभाग घेतला त्या मधून राजनांदगांव जिल्ह्य़ातील मोहला व मोहला तालुक्यातील मानपूर, कांकेर व दलली जिल्ह्य़ातील भानुप्रतापूर, खडगावं, भरीटोला, या परिसरातील खेळाडूंनी सहभाग घेतला व त्याच प्रमाणेच महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्ह्य़ातील तालूका धानोरा, व कुरखेडा तालूका अतंर्गत गावातील 15 टीम च्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या आठ दिवसीय राज्य व आंतरराज्य क्रिकेट सामन्यात विजय असणारे पहिले प्रथम क्रमांकावर असलेले विजेता टीम कोषाराव क्रिकेट क्लब मानपूर छत्तीसगढ यांना सरपंच शिवप्रसाद गवरणा ग्रामपंचायत मुरुमगाव व तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कूरैशी, गोंडवाना समाज मुरुमगाव तर्फे महेश जाडे,सचिव आखाडे ग्रामपंचायत मुरुमगाव, मूनिर शेख, बैसाकूराम कोटपरीया मुरुमगाव याचां हस्ते प्रथम पारितोषिक 21021/- देण्यात आले.
द्वितीय क्रमांकावर असलेल टीम क्रिकेट क्लब सावरगावं महाराष्ट्र राज्य यांना तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कूरैशी,सरपंच शिवप्रसाद गवरणा याचां हस्ते 15015/- द्वितीय पारितोषिक देण्यात आले, व तृतीय क्रमांकावर असलेल टीम बालकृष्ण क्रिकेट क्लब मुरुमगाव महाराष्ट्र या टीम ला राजेंद्र कोठवार, अभिजीत मेश्राम, सरपंच शिवप्रसाद गवरणा याचां हस्ते 10010/- तृतीय क्रमांक पारितोषिक देण्यात आले.
त्याच प्रमाणेच प्रत्येक खेळाडूंना मॅनऑफ दि सिरीज मुकेश बालकृष्ण क्रिकेट क्लब मुरुमगाव महाराष्ट्र, मॅन ऑफ दी मॅच शत्रू सिन्हा कोषाराव क्रिकेट क्लब मानपूर छत्तीसगढ, हॅटट्रिक षट्कार शत्रू सिन्हा कोषाराव क्रिकेट क्लब मानपूर छत्तीसगढ राज्य, हॅटट्रिक चौकार रवि गवरणा जय टिपागड़ क्रिकेट क्लब मुरुमगाव महाराष्ट्र राज्य, बेस्ट कॅच जीवन गवरना जय टिपागड़ क्रिकेट क्लब मुरुमगाव महाराष्ट्र राज्य, मेडल ओवर लहीराम धुर्वे दामेशवर क्रिकेट क्लब या खेळाडूना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या राज्य आंतरराज्य क्रिकेट चषक स्पर्धेत सार्वजनिक क्रीडा मंडल मुरुमगाव सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे मौजा मुरुमगाव येथील व परिसरातील नागरिक खेळाडूंचे मनोधैर्य वाढविले व कौतूक केले.