अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, गौरखेडा येथील घटना..

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

नजिकच्या गौरखेडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने गौरखेडा शेतशिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (३१)रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

        अशोक महादेव वानखडे(६०)असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून काल दि.३० डिसेंबर रोजी अशोक वानखडे हे सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चांदई मार्गे शेतात गेले होते. तेव्हापासून ते घरी परत गेले नव्हते.

        आज दुपारच्या सुमारास खल्लार चंडिकापूर मार्गावरील गौरखेडा शेतशिवारात त्यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

         त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र चंडिकापूर शाखेचे एक लाख रुपये कर्ज होते. घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी पोलिस कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय,दर्यापूर येथे पाठविला.