नववर्ष,मुख्य संपादक आणि दखल न्यूज भारतच्या माझ्या मित्रांनो…       सस्नेह अशा भरभरून वैचारिक शुभेच्छा अंत:करणपुर्वक!.. — “सविस्तर,एका उमेदीने..   डॉ.- प्रा.मंगेश रनदिवे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी चंद्रपूर..

          दखल न्यूज भारतच्या कार्यपद्धतीचा मागोवा घेत असतांना माझ्या मनात अनेक प्रकारची द्विधा मनस्थिती होती.

           त्या मनस्थितीला बाहेर पाडावे की मनात जैशे थे ठेवावे या विचारात असतानाच कार्याचे,आत्मसन्मानाचे,स्वाभिमानाचे,अस्मितेचे व आत्मविश्वासाचे प्रचंड थैमान मला स्वस्थ बसू देत नव्हते.

           आणि म्हणूनच मी माझ्या वैचारिक क्षमतेने आदरणीय मुख्य संपादक प्रदीप रामटेके सर,संपादक आदरणीय ऋषी सहारे सर,संपादक आदरणीय प्रितम जनबंधु सर,आदरणीय वृत्त संपादीका दिक्षा कऱ्हाडे मॅडम,कार्यकारी संपादक आदरणीय दामोधर रामटेके सर,कार्यकारी संपादक आदरणीय संजय टेंभुर्णे सर,उपसंपादक आदरणीय प्रेम गावंडे सर,उपसंपादक आदरणीय दिनेश कुऱ्हाडे सर,उपसंपादक आदरणीय युवराज डोंगरे सर,व इतर सर्व आदरणीय विभागीय प्रतिनिधी,जिल्हा प्रतिनिधी,तालुका प्रतिनिधी,शहर प्रतिनिधी,ग्रामीण प्रतिनिधी,”यांच्यावर माझ्या आकलन शक्ती नुसार भाष्य करावे असे वाटले,म्हणूनच भाष्य करतो आहे..

         मागील सर्व अनुभव सोबत असताना आपण नविन वर्षात पदार्पण करतो आहे.काय देणार आणि काय घेणार ही आयुष्याची गोळाबेरीज कधी यशस्वी करीत असते तर कधी अयशस्वी करीत असते.

          मात्र,आयुष्यातील यशस्वी व अयशस्वी अशा दोन्ही वाटेत टिकणे आणि टिकून राहणे यात परम कर्तव्याचा मैत्रीभाव असतो आणि अंतीम श्वासातंर्गत उदिष्टापर्यंत पोहोचण्याचा ध्येयक्रम असतो हे तितकेच महत्त्वाचे आहे.

         दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे तथा दखल न्यूज भारत युट्यूब चॅनलचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके सरांच्या वास्तव्यातंर्गत वैचारिक बातम्या,अग्रलेख व संपादकीय लेख आवर्जून वाचयचो.

         प्रवाहाच्या विरोधात जावून लोकहितासाठी धडधड लिहिणारा व्यक्ती अनुभवायला मिळणे साधी व सोपी बाब राहात नाही.

          ओळख नसताना मला वाटले प्रदीप रामटेके सरांसोबत बोलले पाहिजे.म्हणून एक दिवस त्यांना काॅल केलोय आणि विनंम्रपणे नमस्कार केला,त्याच विनंम्र आदराने त्यांनी सुध्दा नमस्कार म्हटले.

             म्हणालो,सर तुम्हाला भिती वाटत नाही काय?ते माझी परिभाषा समजून गेले आणि मला लगेच म्हणाले तुम्ही सुद्धा पत्रकार आहात,या देशातील प्रत्येक नागरिक सुध्दा पत्रकार आहे.आणि जो व्यक्त होतो तो पत्रकार!,या त्यांच्या वाक्याने तर मी पुरता गोंधळून गेलो होतो.

            मात्र त्यांनी स्पष्ट करताना सांगितले की,लिहिणारे पत्रकार लेखणीच्या माध्यमातून नेहमी व्यक्त होत असतात तर प्रत्येक व्यक्ती हा समस्यातंर्गत,आनंदातंर्गत,समाधानातंर्गत,सुखातंर्गत,दुःखातंर्गत, अनुभवातंर्गत आणि विविध कार्यक्रमांच्या प्रसंगी व्यक्त होत असतो.आपण त्यांच्यातील पत्रकारिता ओळखली पाहिजे..पत्रकारांची लेखनी आणि प्रत्येक व्यक्तीतील व्यक्तता म्हणजेच पत्रकारितेची उतंम दिशा होय व पत्रकारितेचे उतंम ठिकाण होय,हे समजून घेतले पाहिजे.आणि माझ्या डोक्यात पत्रकारितेचा संदर्भीय प्रकाशच पडलाय.

          त्यांना ऐकासाठी चंद्रपूर येथील दखल न्यूज भारतच्या बैठकीला आवर्जून गेलो.त्यांनी सदर बैठकीत समाजाचे,राजकारणाचे,विचारांचे,भुमीकांचे मर्म साध्या भाषेत समजावून सांगितले व अडाणी व्यक्ती सुध्दा पत्रकार असतो हे लक्षात आणून दिले हा सदर बैठकीतील माझ्यासाठी अस्मरणीय असाच प्रसंग होता असे म्हणायला हरकत नाही.

            “आ.प्रदीप सरांनी,”दखल न्यूज भारत वेब पोर्टलच्या,माध्यमातून अख्खा महाराष्ट्र राज्यात संपादकांच्या द्वारा प्रतिनिधी नियुक्त केले व पत्रकारिता क्षेत्रात अनुभवाने शुन्य किंवा कमी असलेल्या व्यक्तींना संधी देत मोठे केले हे विसरण्याजोगे नाही.

            याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रात वाटचाल करताना येणाऱ्या अळचणींना सामोरे कसे जायचे?या अनुषंगाने जिल्ह्याचे स्थळ असलेल्या अकोला,अमरावती,नागपूर,चंद्रपूर येथे व तालुक्याचे ठिकाण असलेल्या आरमोरी व वरोरा येथे दखल न्यूज भारत वेब पोर्टलच्या सर्व सहकाऱ्यांच्या सामुहिक बैठका घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास,आत्मसन्मान, अस्मितेचे बळ देण्याचे उतंम कार्य प्रदीप सरांनी केले.

           एवढेच काय तर दखल न्यूज भारत वेब पोर्टल अंतर्गत कार्य करणाऱ्या संपादक,कार्यकारी संपादक,उपसंपादक,नागपूर विभागीय प्रतिनिधी,जिल्हा प्रतिनिधी,तालुका प्रतिनिधी,शहर प्रतिनिधी,ग्रामीण प्रतिनिधी यांच्या सर्वदूर सर्वसमावेशक अशा कार्याचा उतंम सन्मान कसा करावा हे प्रदीप सरांनी आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवून दिले.

             याचबरोबर ज्यांना पत्रकारिता नेमकी काय आहे हे कळत नव्हते त्यांना शब्दरूप व्यक्त करीत जनमानसात लोकप्रिय करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले,या सत्याला सुध्दा नाकारता येत नाही.

                कोरोणाच्या कठीण काळात प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रदीप सरांच्या धारधार लेखनीने कोरोणाचे सत्य बाहेर पडायचे आणि आम्हाला वैचारिक परिपक्वता अन्वये उर्जायुक्त जगण्याचे आगळेवेगळे बळ मिळायचे हे माझ्या सारखा व्यक्ती कधीच विसरु शकत नाही.

          कोरोणा काळात सर्व परिस्थिती,सर्व व्यवस्था,सर्व यंत्रणा विरोधात असतांना त्या व्यवस्थेला अग्रलेखाच्या द्वारा अभ्यासपूर्ण हादरे देण्याचे काम करणे आकलनाच्या बाहेरचे होते.पण ते प्रदीप सरांनी केले‌.यावरुन त्यांच्यातील दृढ आत्मविश्वास,आत्महिमंत,सखोल अशी सतर्क व तर्कसंगत वृत्ती टिपता आली-जाणून घेता आली, आणि त्यांच्या गुणधर्मातील ध्येयनिष्ठ लोकहितवादी कल्पना समजून घेता आली.

           मागील दिड वर्षाच्या काळातंर्गत प्रदीप सरांवर ओढण्यात आलेले तासेरे,याद्वारे वेशीवर टांगण्यात आलेली त्यांची इज्जत त्यांना सर्व प्रकारे बेसहारा करणारी ठरली,मनस्वी मृत्यूच्या दारात ढकलणारी होती आणि त्यांच्या उदेशातंर्गत सर्व प्रकारच्या प्रगतीचे मार्ग रोखणारी ठरली,हे खरेच आहे.त्यांच्यावर सर्व प्रकारे शब्दरुपी वार झाल्यामुळे ते काही काळ मागे पडलेत हे वास्तव आहे.

          पण अशाही कठीण परिस्थितीत,त्यांनी कुणाच्याही विरोधात ब्र काढला नाही, कुणालाही अनादरणीय बोलले नाही.परत ते म्हणायचे त्यांच्या ओघयुक्त व आवेशसमर्पक भावनातंर्गत ते व्यक्त होतात,होवू द्या‌.या अनुषंगाने माझ्यावर जे संकटे येतील व जे बदनामी होईल त्याला बाजूला सारायला वेळ लागेल,ते सध्यातरी टाळता येत नाही असे खुल्ले होतांना धीरगंभीर म्हणायचे,” तेव्हा,मन हेलावून जायचे.

             विचारांचा तोल घसरु न देता दुरदृष्टीने विचार करणारे व संकटमय परिस्थितीत सुध्दा सर्वांच्या बाबतीत आदरमय व्यक्त होणारे प्रदीप सरांसारखे क्वचितच व्यक्तीमत्व आढळून येईल!

            प्रदीप सर बेसहारा आणि अनेक संकटात असताना त्यांना मी फक्त एवढेच म्हणायचो,”सर,हरु नका!.. आणि ते पटकन म्हणायचे मी जिवंत आहे…परत मी म्हणायचो सर यशस्वी व्हायचे आहे!आणि लगेच सरांचे उत्तर असायचे,”मागे वळलोच कुठे,?या त्यांच्या वाक्यावरून प्रदीप सरांमध्ये किती मोठा आदम्य विश्वास आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही.

        दिड वर्षाच्या कठीण काळात सरांना २ प्रकारचे गंभीर आजार जळले आहेत.त्या आजारावर उपचार करताना त्यांना बरीच कसरत करावी लागत आहे.मात्र,खिशात एक रुपया नसताना आनंदाने जगणारे व्यक्ती म्हणजे आमचे प्रदीप सर!

            मनातील दुःख व समस्या भाव बाहेर न पाडता, आलेल्या सर्व परिस्थितीला त्यांनी स्विकारले आणि कडवट आयुष्यातील एक-एक दिवस काढले व परत काही काळ त्यांना काढावे लागणार आहेत असे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येते आहे.यावरुन त्यांच्यात,”परिस्थिती बाबत समन्वय परिपक्वता, स्पष्ट झळकते आहे.

            मृत्यू सांगून येत नाही हे खरे असले तरी,”सर,बोललेले शब्द पुर्ण करतील व शेवटचा श्वास बंद करतील असा मला तरी विश्वास आहे.

           “मित्रहो,”अपमान या शब्दाला मनात स्थान न देता अनेकांना मदत करणारे व्यक्तीत्व,अनेकांना घडविणारे व्यक्तीत्व म्हणजे प्रदीप सर! ते काही वेळेनुसार व काही परिस्थिती नुसार मागे पडले म्हणून त्यांना सहन न होणारे बोचरे शब्द बोलायचे,सोडून जायचे हे तर समजण्यापलीकडचेच आहे.

           दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे संस्थापक तथा मुख्य संपादक प्रदीप सर म्हणजे उतंम मार्ग असून कठीण प्रसंगातील स्वच्छ वाहणारा झरा आहेत.

       त्यांनी,आम्हा सर्वांना पत्रकारितेतील सन्मान, स्वाभिमान सांगितलाय आणि अस्मिता सांगितली व गोरगरीब,वंचीत,अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त, शोषीत असलेली सर्व जनताच पत्रकारितेचा मुख्य केंद्रबिंदू आहे हे उकल करुन लक्षात आणून दिले आणि यावर बिनधास्त बातम्या घ्या! मी आहेच असा धीर दिला..

           एवढ्या मोठ्या आदम्य विश्वासातील वैचारिक मजबूतता व प्रासंगिक मनोबल प्रदीप सरांसारखे आमच्या जवळ असतांना आम्ही एकडेतिकडे भटकतोय व पळवाट काढतोय,याला काय म्हणावे? कदाचित आमच्यातील संकुचित मनोवृत्ती आम्हालाच कमजोर करण्यासाठी आहे काय?हे पारखले पाहिजे. 

           वेब पोर्टलच्या दुनियेत संपादक म्हणून पुढे येणारे आताच्या काळात भरपूर दिसून येत आहेत.मात्र त्यांच्यात संपादक व्यक्तीत्वाला आवश्यक असलेले सक्षम वैचारिक असे मजबूत गुणधर्म असणे गरजेचे आहे. 

             आ.ऋषी सहारे सर,आ.प्रितम जनबंधु सर,आ.दिक्षा कऱ्हाडे मॅडम,आ.संजय टेंभुर्णे सर,आ.दामोधर रामटेके सर,आ.प्रेम गावंडे सर,आ.दिनेश कुऱ्हाडे सर,आ.युवराज डोंगरे सर,आ.ऋग्वेद येवले सर,आ.निलय झोडे सर,आ.शेखर इसापुरे सर,आ.अश्विन बोदेले सर,आ.अनिलकुमार ठवरे सर,आ.अमान कुरेशी सर,आ.उमेश कांबळे सर,आ.चेतक हत्तीमारे सर,आ.जाकीर सैय्यद सर,आ.कमलसिंह यादव सर,आ.सुधाकर दुधे सर,आ.बाळासाहेब सुतार सर, आ. राजेंद्र रामटेके, आ. प्रलय सहारे, आ. रामदास ठुसे आणि इतर सर्व आ.प्रतिनिधी हे दखल न्यूज भारत वेब पोर्टल मध्ये अजूनही मजबूतपणे कार्यरत आहेत.

           त्यांच्या बातम्यांमुळे समाजातील शेवटच्या नागरिकांना न्याय मिळतो आहे.याला कारण त्यांच्यात सर्व समाजातंर्गत नागरिकांप्रती असलेली सद्भावना होय,आपुलकी व जिव्हाळा होय,समानतातंर्गत समान मैत्रीभाव होय.याचबरोबर सर्व नागरिकांप्रती असलेली हृदयस्पर्शी तळमळ होय.

       आ.प्रदीप सरांची पत्रकारिता आत्मविश्वास, आत्मसन्मान, अस्मिता, कणखरपणा, मजबूतपणा, स्वाभिमान व स्वावलंबन,जनहितार्थ सर्व कर्तव्य, समान सदभाव, सांगतो आहे.

        एवढेच काय तर ज्या संघटना व पक्ष देशातील तमाम नागरिकांचे हक्क नाकारतात व त्यांचे सातत्याने शोषण करतात,अशांना ओळखण्याची वैचारिक दूरदृष्टी प्रदीप सर लेखनीच्या द्वारे नेहमी व्यक्त करतात हे आपण ओळखले पाहिजे,त्यांच्या जनकल्याणाच्या संकल्पना समजून घेत त्यांना सहकार्य केले पाहिजे.

            प्रदीप सरांसारखे खुल्लमखुल्ला व्यक्त होणारे मुख्य संपादक,भेदभाव न करणारे उतंम मित्र,सर्वांचा आदर करणारे उत्कृष्ट सारथी,कुणालाही कमजोर न समजणारे सक्षम विचारपीठ,शोधूनही पत्रकारिता क्षेत्रातंर्गत आयुष्यातील प्रसंगात भेटणार नाहीत.

          म्हणूनच दखल न्यूज भारत वेब पोर्टल मध्ये कार्यरत असलेले सर्व आदरणीय त्याच वृत्तीचे आहेत असे समजतो आहे.

***

शुभेच्छा…

            येणाऱ्या वर्षात आपण उत्तरोत्तर खूप मोठे व्हावे,आपण खूप प्रगती करावी,आपल्या कार्यातून उपेक्षितांना न्याय मिळावा,तुम्ही व तुमचे कौटुंबिक सदस्य सुखी रहावेत,आपला मानसन्मान वाढावा,आपण सर्व दृष्टीने सक्षम व्हावे….

       या सद्भावना सह…आपणास नवीन वर्षाच्या अंत:करणपुर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आहे!

****

वाढदिवस..

      प्रदीप सरांचा वाढदिवस फरवरीच्या १ तारखेला येतो आहे.आपण सरांचा वाढदीवस आपल्या परीने व्यक्त करावा करावा अशी माझी सद्भावना आहे.

       मात्र,मी तुमच्यावर वाढदिवस व्यक्त करण्यासाठी भार देतो आहे असे समजून घेवू नये.

       आपली इच्छा व आपली सद्भभावना…