धानोरा /भाविक करमनकर
स्थानिक धानोरा येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे मराठी दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर तर प्रमुख अतिथी म्हणून कीर्तिवान घडले सर व घडले मॅडम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चव्हान व प्रमुख अतिथी किर्तीवंत घडले सर यांच्या हस्ते डॉक्टर सी व्ही रमण व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर यांनी आधुनिक काळात विज्ञानाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले तसेच प्रमुख अतिथी म्हणून कीर्तीवान घडले सर यांनी विज्ञान व मानवी जिवन तसेच मराठी भाषेचे जतन या विषयावर विद्यार्थ्यांना विस्तृत असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ गणेश चुधरी सर तर संचालन रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा ज्ञानेश बनसोड सर यांनी केले तर आभार प्रा डॉ प्रियंका पठाडे यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील प्रा डॉ किरमिरे प्रा डॉ वाघ प्रा डॉ लांजेवार प्रा डॉ झाडे प्रा डॉ गोहणे प्रा डॉ मुरकुटे प्रा डॉ धवनकर प्रा भैसारे प्रा तोंडरे प्रा वाळके डॉ जमबेवार प्रा आवारी प्रा करमणकर प्रा खोब्रागडे प्रा वटक प्रा धाकडे प्रा रणदिवे प्रा मांडवगडे इत्यादी व सर्व प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.