दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
नागपूर शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूक मतमोजणी नुसार महाविकास आघाडी समर्थित काॅंग्रेसचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा दणदणीत विजय होणार असल्याचे चित्र आहे.
सुधाकर अडबाले यांना १४ हजार ६१ मतदान मिळाले आहे तर भाजपा समर्थित नागो गाणार यांना ६ हजार ३०९ मतदारांनी पसंती दिली आहे.
निवडणूक निरीक्षक अरुण उन्हाळे व निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी मतमोजणी प्रक्रिया अंतर्गत स्वतः उपस्थित होते.