वय वृद्ध कलावंतांची ऑफलाईन अर्ज तपासून निवड करा..  — उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्युज भारत 

  साकोली : प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने वय वृद्ध कलावंतांची ऑफलाईन अर्ज तपासून निवड करावी या करिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदागवळी साहेब यांना निवेदन देण्यात आले.

            जिल्ह्यातील वृद्ध कलावंत यांना पेन्शन यासाठी सन २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ मध्ये ऑफलाईन अर्ज पंचायत समिती मध्ये सादर केले आहेत. परंतु कलावंतांची निवड समिती नसल्यामुळे अर्जाची तपासणी झाली नाही.

             संघटनेच्या वतींने 29 जुलै 2024 ला आंदोलन करण्यात व नंतर मानधन समिती तयार करण्यात आली.

             परंतु यावर्षी वृद्ध कलावंताची ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत परंतु २०२१-२२,२०२२-२३, २०२३-२४ मध्ये वृद्ध कलावंतांनी भरलेले ऑफलाईन अर्जाची अगोदर निवड करावी व २०२४-२५ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात यावे जेणेकरून मागील तीन वर्षांपासून ज्यांनी ऑफलाईन अर्ज केला त्या कलावंतावर अन्याय होणार नाही व मानधनापासून वंचित राहणार नाही तसेच दोन महिन्यांपासून फक्त भंडारा जिल्ह्यातील ऑनलाईन पोर्टल बंद आहे तो पोर्टल सुद्धा तात्काळ सुरू करण्यात यावा यासाठी प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे पदाधिकारी यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदागवळी साहेब, यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी समाजकल्याण सभापती मदनभाऊ रामटेके, शिक्षण सभापती रमेश पारधी उपस्थित होते.

            निवेदन देतांना प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे केंद्रीय संयोजक मनोज भाऊ कोटांगले, साकोली संघटनेचे संचालक तिर्थानंद बोरकर, भंडारा तहसीलचे महासचिव सोमप्रभू तंदुळकर उपस्थित होते.