उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती येथील ऐतिहासिक विज्जासन बुध्दा लेणीच्या माथ्यावरील भव्य बुध्द मुर्ती धम्मद्वेष्ट्या समाज कंटकांनी 31डिसेंबरच्या रात्री फोडुन टाकली .
ही वार्ता सकाळी 1 जानेवारीला भिमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यास सज्ज झालेल्या बौध्द बांधवांना कळताच सर्वांनी घटनस्ळाकडे धाव घेतली. पाहता पाहता हजारोच्या संख्येने बौध्द समाज बुध्द लेणी परिसरात गोळा झाला.
घटनास्थळावर आधीच दाखल झालेल्या पोलीस प्रशासनाने कपड्याने झाकुन ठेवालेली तथागत भगवान बुध्दाची विशाल मुर्ती खंडित झालेली पाहुन समाजात संतापाची लाट पसरली आणी तिथुनच बौध्द समाज बांधवांनी मोर्चा आणी भद्रावती बंद च्या आंदोलनास सुरवात केली.
ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी येथुन भद्रावती बंद चे आव्हान करीत मोर्चा नागपुर – चंद्रपुर महामार्गावर आला. तिथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तहसिलदार भद्रावती यांना बौध्द समाजा तर्फे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या घटनेची वार्ता समजताच भिक्खु संघ भद्रावतीत दाखल झाला . संपुर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर भिक्खु संघाने लेणीच्या माथ्यावर घटनास्थळीच धरणे आंदोलनास सुरवात केली. भिक्खु संघाच्या सोबत शेकडो उपासक – उपासिका धरणे आंदोलनात सहभागी झाले.
प्रमुख मागण्या :-
1) मुर्ती तोडुन खंडित करणाऱ्या समाज कंटकांना 24 तासात शोधुन कठोर कारवाई करावी.
2) फोडण्या आलेल्या बुध्द मुर्तीच्या ठिकाणी त्वरीत दुसरी बुध्द मुर्ती बसवुन देण्यात यावी.
3) बुध्द लेणी परिसरात CCTV कॕमेरे बसविण्यात यावे.
4) परिसरात लाईटची चोख व्यवस्था करण्यात यावी.
5) रात्रपाळीस चौकीदाराची व्यवस्था करावी.
इत्यादी मागण्या पुर्ण होईपर्यंत बौध्द समाजा तर्फे है आंदोलन सुरुच राहणार आहे.