दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : येथील टपरी, पथारी,हातगाडी व माऊली भाजी मंडई आळंदी शहर यांचे वतीने नुकतेच आळंदी नगरपालिकेवर मुख्याधिकारीपदी नियुक्त झालेले कैलास केंद्रे यांचा महिलांनी औक्षण करून इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचा यथोचित असा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरून सन्मान करण्यात आला.
गेली अनेक वर्षांपासून येथील फेरीवाला धोरण समिती यांचे अंतर्गत चाकण चौक येथे भाजी मंडई साठी आरक्षित असणारी जागा या ठिकाणी पार्किंगच्या एका कडेने भाजी मंडईची पालिकेकडून उभारणी करण्यात आली होती. मात्र त्यांना गेल्या महिन्यात पालिकेने नोटीस काढून सदरील जागा खाली करून पालिकेकडे सुपूर्त करावी अशी नोटीस या व्यापाऱ्यांना देण्यात आल्याने त्यांना पालिकेचे हे धोरण मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. परंतु मुख्याधिकारी अंकुश जाधव यांची बदली होऊन त्यांच्या जागी सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची नियुक्ती झाल्याने संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेत नवनियुक्त मुख्याधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून यातून पालिका प्रशासन व संघटना यांच्यामधून समन्वय साधून प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन नवनियुक्त मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी संघटनेस दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मल्हार काळे, अशोक पांढरे, राहुल कुराडे, प्रियेश सोनवणे, गणेश मोटकर, सचिव एम.डी. पाखरे, वसंतराव घुंडरे, शिवाजी मुसळे,शिवाजी जगताप, रामदास मेहत्रे, अशोक मुंडे, सचिन आडवळे, सुरेश माने, सुलतानभाई शेख, सावित्री धुंडरे, श्रीमती सुरेखा कुराडे, सुशीला पांढरे, मीराताई लबडे, सुरेखा वाघ आदींसह संघटनेचे इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.