ऋषी सहारे
संपादक
आरमोरी…. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या ऐतिहासिक शौर्य दिनानिमित्त शूर वीरांना मानवंदना व फुले दाम्पत्यानी पुण्यातील भिडेवाड्यात महिलांसाठी सुरू केलेली पहिली शाळेच्या निमित्ताने आरमोरी येथील समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने स्थानिक भगतसिंग चौकात रविवारी सायंकाळी मेणबत्या पेटवून शूर वीरांना मानवंदना देत फुले दाम्पत्याना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक विचारवंत जयकुमार मेश्राम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते मनीष राऊत, डॉ. प्रदीप खोब्रागडे, आनंद उके, जयकुमार शेंडे, अँड, अमित टेम्भुरने, अँड उमेश कुकुडकर,प्रा. अमरदिप मेश्राम, महेंद्र रामटेके, समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे,उपाध्यक्ष प्रवीण रहाटे आदी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम व मनीष राऊत यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन समता सामाजिक युवा संघटनेचे सचिव अनुप रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाधक्ष प्रवीण रहाटे यांनी केले कार्यक्रमाच्या समता युवा सामाजिक संघटनेचे सहसचिव मंगेश पाटील कार्यकर्ते , निखिल दुमाणे, भूषण काळबांडे,सौरभ मस्के, रुपेश जवंजाळकर,विवेक गुरनुले, आदित्य सोनटक्के, हरपलं ढवळे, मयूर सोमनकर, प्रतीक रामटेके, अमोल टेम्भुरने आदीनी परिश्रम घेतले.