निरा नरसिंहपुर दिनांक : 02
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील संपूर्ण गावचे कुलदैवत पीरसाहेब बाबांच्या पावन व पुण्यभूमी मध्ये रजपूत कुटुंबांच्या वतीने प्रथमच वडिलांचा 81 वा सहस्त्रचंद्रदर्शन अभिष्टचिंतन सोहळा पिंपरी बुद्रुक यथील रजपूत कुटुंबाच्या वतीने करण्यात आला.
या अभिष्टचिंतन कार्यक्रमा निमित्त बापूसाहेब देहुकर महाराज बोलत आसताना म्हणाले की,, आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर आहे. माता आणि पिता यांची सेवा कशी करायची हे पिंपरी गावच्या रजपूत कुटुंबानेच दाखवून दिले. ८१ किलो वजनाची ज्ञानेश्वरी गाथा ग्रंथ, वारकरी व भजनी मंडळासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे वाटप करण्यात आले .वैकुंठवासी नागरभाभी यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवून माऊली निवास येथील दयानंद तुळशीराम राजपूत व रामहरी तुळशीराम राजपूत या दोघांच्या मार्गदर्शना खाली व संपूर्ण रजपूत कुटुंबांच्या परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी सात ते नऊ वाजता शांती होम हवन व ग्रंथ तुला,, गणेश काकडे यांच्या हस्ते केली. नंतर दहा ते बारा वाजता संत तुकाराम महाराजांचे गाथा पारायण साठी गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांच्या हस्ते ग्रंथ पूजन व गाथा भजन करण्यात आले. अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त तुळजीराम रजपूत यांना पुढील जीवनासाठी आशीर्वाद दिला. तसेच सायंकाळी चार वाजता नातेपुते येथील समाज प्रबोधनकार ह भ प सागर बोराटे महाराज यांची कीर्तन सेवा झाली. रात्री आठ ते दहा वाजता तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथील हभप बालाजी महाराज शिरसट यांचे सोंगी भारुडाचा कार्यक्रम सांगण्यात आला. नरसिंहपुर, गिरवी, टणु ,गोंदी, ओझरे, बावडा, गारअकुले, टाकळी, इंदापूर, अकलूज, गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, सराटी, या सर्व भागातून टाळकरी, विणेकरी, मृदुंग वादक व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व सर्वच भाविकान साठी महाभोजन व अन्नदान सेवा करून कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्र संचलन ह-भ-प, महेश सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शन रामहारी रजपुत यांनी केले.