संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
तुमसर – रविवार दि. 01/01/2023 ला महात्मा ज्योतिबा फुले ब.उ.विकास मंडळ तुमसर तर्फे वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, तसेच नवनियुक्त ग्रा.पं.पदाधिकारी व सेवेत रुजू झालेले कर्मचारी यांचा सत्कार सोहळा शकुंतला सभागृह तुमसर येथे महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बंडूभाऊ बनकर जि. प. सदस्य भंडारा हे होते, तर प्रमुख अतिथी मंडळाचे अध्यक्ष श्री. ताराचंदजी कटनकार सर, श्री, श्रीकांतजी भुसारी अ.भा. माळी महासंघ अध्यक्ष भंडारा जिल्हा, श्री.अनिलजी किरणापुरे पं.स. सदस्य साकोली, श्री. यशवंतजी उपरीकर महा.शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त, मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. नामदेवजी कांबळे, सौ. देवश्रीताई विजय शहारे नगर सेविका मोहाडी नगरपंचायत, सौ.वृंदाताई गायधने समुपदेशक संस्था संचालिका तुमसर, सौ. कुसुमताई कांबळे संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री. विजयजी शहारे सा. कार्यकर्ता मोहाडी, श्री. दीपकजी येरणे सर श्री. शंकरजी कांबळे या सर्वांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव श्री. जोशीजी नेरकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राधेश्यामजी आमकर, श्री. सेवकरामजी किरणापुरे, श्री. शंकरजी गिरडकर, श्री. मुरलीधरजी बनकर, श्री. मनोजजी उपरीकर, श्री. देवरावजी राऊत, श्री. विनोदजी कांबळे, श्री. नीलकंठजी हजारे, श्री. छत्रपतीजी कांबळे, श्री. अरविंदजी गोटेफोडे तसेच मंडळाचे आजीवन सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले.
श्री. बंडूभाऊ बनकर जि.प.सदस्य भंडारा यांनी नव नियुक्त ग्राम पंचायत सरपंच, सदस्य-सदस्या, नव नियुक्त कर्मचारी तसेच मंडळाचे आजी व माजी पदाधिकारी यांना स्वहस्ते शाल-श्रीफळ देऊन सर्वांचा सत्कार केला. सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार श्री. नंदरधने सर यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.