रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर :-
डॉ .बाबासाहेबांना अपेक्षीत असणारा समाजवाद या देशाच्या संविधानात आलाच नाही. आपण फक्त लोकशाहीचा स्विकार केला असला तरी खाद्यावर शाल पांघरून निळा टिका लावून आंबेडकरवादी म्हणून प्रस्तापितांसोबत गुलामीने जगत आहोत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानात समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम शब्द असले तरी त्यानुसार सरकार चालवून घेत नाही या देशातील रोजगार, नोकऱ्या, आरक्षण व अधिकार संपले तरी आपला झोपलेला मानूस जागा झाला नाही मात्र मुठभर लोकांनी जागा निर्माण केली.त्यामुळे देशातील लोकांना पाच रुपये किलो अनाजासाठी लाईन लावावी लागते ही शोकांतीका आहे.
मात्र संविधानानुसार अधिकार हक्क मिळाले असले तरी संविधानाच्या जाणिवा निर्माण झाल्या नसल्याचे आयोजीत कार्यक्रमात प्रा. संजय मगर उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
संविधान सन्मान दिन समारोह समिती वडाळा (पैकू) यांच्या वतीने संविधानाच्या 75 व्या अमृत वर्षानिमीत्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन वडाळा ( पैकू ) येथील आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले होते.
संविधानाची प्रास्तवीकाचे वाचन मेश्राम यांनी केले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे म्हणाले की राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीत परावर्तीत झाली पाहिजे असे डॉ.बाबासाहेब म्हणत होते तसे झाले का नाही.
आपल्याला संविधानाने मताचा अधिकार दिला त्याचा कोनी वाईट तर कोनी चांगला उपयोग करतो त्यामुळे देशात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.घर घर संविधान घेवून जान्याची गरज आहे. संविधान टिकवायचे असेल तर जबाबदारी नागरीकांनी घेतली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संविधानाचे प्रचारक आकाश पवार म्हणाले की आम्ही भारताचे लोक या शब्दातच संपूर्ण भारतीय संविधानांचा सार आहे. संविधानाला पंचात्तर वर्षा होवून संविधान समजलो नाही. संविधानाला आपणच संकूचित करून ठेवले आहे. अजूनही गाव खेड्यात संविधान काय आहे माहीत नाही. या देशात मन की बात होते मात्र संविधानाचे वाचन होत नाही हि एक शोकांतिका आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा कार्याअध्यक्ष ओबिसी कर्मचारी संघ रामदास कामडी म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विशिष्ट समाजासाठी संविधान लिहले नसून संपूर्ण भारतीयांसाठी संविधान लिहिले असून प्रथम ओबीसीसाठी संविधात ३४१ कलम लिहले ओबीसी समाजाने संविधान समजून घेने महत्वाचे आहे.
दरम्यान इंदिरा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करून समता सैनिक दलांचा सलामी मार्चपास संविधान चौकापर्यंत काढन्यात आला व संविधान चौकातील अशोक स्तंभ मूर्तीचे उद्धघाटन सेवा निवृत्त सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ चंद्रपूर चे जिल्हा कार्याध्यक्ष रामदास कामडी, कार्यक्रमाचे उद्घाटक सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संविधान प्रचारक आकाश पवार, फुले शाहू आंबेडकरी विचारवंत प्रा. संजय मगर, समाजसेविका ममता निकाळजे, समारोह समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अनिल गेडाम, किशोर नागदेवते आभार नंदन लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाला हजारो नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान वकृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, गित गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व एकल नृत्य स्पर्धेत भाग घेनाऱ्या युवक युवती व महिलांना बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.