महाराष्ट्राच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 288 जागापैकी 232 जागा EVM ने( राजीव कुमारने मुख्य निवडणूक आयुक्ताने ) मिळवून दिलेल्या असतांना,26 नोव्हेंबर या दिवशीच संविधानातील तरतुदीनुसार सरकार स्थापन व्हायला पाहिजे होते.किंवा राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे होती!
परंतू,तसे काही झालेले नाही महायुतीतीला स्पष्ट पाशवी बहुमत मिळालेले असतांना,निवडणूक आयोगाने कुणाचीही तक्रार ऐकून घेऊन कोणताही अडथळा आणलेला नसताना सुद्धा….
महाराष्ट्रात सरकार अजूनही 8 दिवसानंतर सुद्धा का स्थापन होऊ शकले नाही?
हे संविधानाचे उल्लंघन 100% आहे.
एवढे मोठे अभूतपूर्व यश महायुतीला मिळून सुद्धा 75% जनता निवडून आलेल्या उमेदवाराला डोक्यावर उचलून घेऊन रस्त्यावर का जल्लोष करत नाही?
अभूतपूर्व विजयी मिरवणूका का निघत नाहीत?
मोदी – शहा यांच्या आभार मानणाऱ्या अलोट,तुफान गर्दीच्या धन्यवाद सभाचे आयोजन का होत नाहीत?
का EVM ने सेटिंग केल्याच्या मर्यादा अती ओलांडल्यामुळे महायुतीला सरकार स्थापण्याची लाज तर वाटत नाही ना!
नाही निर्लज्जाना लाज वाटत नाही.
याचे एकच कारण असू शकते,ते हेच की,ज्या साम,दाम,दंड आणि भेदाच्या कूटनितीच्या बळावर महायुती निर्माण झाली. तीच कूटनीती यांच्या पथ्यावर पडलेली आहे…
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरत आहे..
म्हणून असंविधानिक सरकार स्थापन होण्यास उशीर होत आहे.
परंतू,या व्यवस्थेने हा संविधानावर केलेला परतून लावण्याचा दृढसंकल्प आपण….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
यांच्या…
68 व्या महापारिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर 2024 रोजी अभिवादन करुन,या संविधानावर RSS / भाजपने केलेल्या हल्ल्याचे उत्तर संविधानिक मार्गाने उत्तर 9 डिसेम्बर सोमवारी महामोर्चाचे आयोजन करुन व्यवस्थेला जाब विचारूया..
आणि…
पुन्हा नव्याने फेरनिवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी निवडणूक आयोगाला भाग पाडूया..
त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील संविधाननिष्ठ कार्यकर्त्याने,जनतेने,सर्व सामाजिक संघटनेने,सर्व राजकीय पक्षांनी महामोर्चाचे नियोजन करुन आयोजन करावे…
आणि….
महाराष्ट्रीयन जनतेने आपली खदखद रस्त्यावर उतरून बाहेर काढावी…
*****
टीप :- आपण सुरुवातीला सहा डिसेंबर तारीख निश्चित झाली होती.परंतू,त्या दिवशी सार्वजनिक शासकीय सुट्टी आली,दुसऱ्या दिवशी शनिवार आला आणि तिसऱ्या दिवशी रविवार आल्यामुळे सोमवारी 9 डिसेंबर ही तारीख निश्चित केलेली आहे.कृपया हा बदल सर्वांनी लक्षात घ्यावा….
मी ग्रुपवर आणि आपल्या वयक्तिक मो.नंबरवर पाठवलेल्या निवेदनातील सार घेऊन संबंधित पोलीस आयुक्त कार्यालय,जिल्हधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय,पोलीस स्टेशनला महामोर्चाची माहिती देण्यासाठी या निवेदनाचा वापर करावा. आणि महामोर्चाच्या वेळी जे मुख्य निवेदन जे द्यायचे असेल ते वेगळे आणि सविस्तर असेल, जे की ते मुख्यनिवडणूक आयोगापर्यंत पोहचेल…
*****
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर,7875452689..