चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:-
ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पक्षीसप्ताहाच्या निमित्ताने आठ दिवस जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण व पक्षीगणना करण्यात येऊन त्याच्या नोंदी इबर्ड व महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेला पाठविण्यात आले.
ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे थोर निसर्गलेखक मारोती चितमपल्ली ते थोर पक्षीतज्ञ डॉ सलीम अली यांचे जयंतीनिमित्त पक्षीसप्ताह लाखनी साकोली व भंडारा तालुक्यात विविध ठिकाणी पाळला जातो.आठही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित पक्षीनिरीक्षण कार्यक्रमाला गुरुकुल आय टी आय,ग्लोबल नेचर क्लब कृष्णमूरारी कटकवार हायस्कूल साकोली,अशोक लेलँड इको क्लब,सिद्धिविनायक हॉस्पिटल, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास तसेच वनविभाग लाखनी व मुंबई शिवाजीनगर ठाणे इन्स्पेक्टर नेताराम मस्के यांनी या उपक्रमास सहकार्य केले.
पक्षीसप्ताहाच्या काळात शिवणी बांध जलाशय,रावणवाडी
जलाशय,तसेच अशोक लेलँड परिसरात तीन दिवस दूरवर भटकंती करून पक्षीनिरीक्षण व पक्षीनोंदी घेण्यात आले. तसेच सावरी तलाव, लाखनी तलाव,लाखोरी व मानेगाव ,रेंगेपार कोहळी आणि मुरमाडी तलावावर पक्षीनिरीक्षण व पक्षीनोंदी इतर दिवशी करण्यात आले.त्यानंतर लाखनी बाजारसमिती परिसर,सातबंधारे परिसर,अशोका बिल्डकॉन परिसर, मानेगाव बेळा परिसर तसेच गडेगाव वनविभाग लाकूड डेपो येथे सुद्धा पक्षीनिरीक्षण कार्यक्रम पक्षीसप्ताहात वेगवेगळ्या दिवशी घेण्यात आले.आठही दिवसात एकंदरीत 80 पेक्षा जास्त पक्षीप्रजातीची नोंद घेण्यात आली.यात स्थानिक पक्ष्यासोबत काही विदेशी प्रजाती पक्ष्याचे नोंदी सुद्धा घेण्यात आले. पक्षीनिरीक्षण सप्ताहाचा समारोप कार्यक्रम नर्सरी पहाडी साकोली येथे ग्लोबल नेचर क्लब च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने निसर्गभ्रमती घेण्यात आली.या कार्यक्रमाला नागझिरा अभयारण्याचे वनक्षेत्रपाल विकास भोसले व फॉरेस्ट गार्ड सुदर्शन ठोंबरे उपस्थित होते.यानंतर सर्वानी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पा कार्यालयातर्फे आयोजित पक्षी छायाचित्र प्रदर्शनीला भेट देऊन विविध पक्ष्याची माहिती व परिचय ग्रीनफ्रेंड्स व ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने यांचे मार्फत करून घेतली.
पक्षीसप्ताह कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ मनोज आगलावे,डॉ मीरा आगलावे, अशोक मुख्य अभियंता एस बी जोशी,पर्यावरण विंगचे प्रमुख देवेंद्र मेंढे,डॉ मनोहर कांबळे, ट्रेनिंग ऑफिसर रामेश्वर बुटे,अशोक लेलँड इको क्लब चे 20 सदस्य अभियंता आणि कर्मचारी,गुरुकुल आय टी आय चे प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम, गुरुकुल संस्थांचे कोषाध्यक्ष जयश्री मेश्राम ,वनविभाग लाखनीचे वनक्षेत्रपाल जितेंद्र बघेले,फ़ॉरेस्ट गार्ड रोहिणी शहारे तसेच गुरुकुल आय टी आयचे 10 विद्यार्थी,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे निसर्गमित्र युवराज बोबडे,पंकज भिवगडे, रोशन बागडे,गोविंदा धुर्वे,सौरभ चचाणे, सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे,निसर्गमित्र मयुर गायधने,सलाम बेग इत्यादी जणांनी तसेच ग्रीनफ्रेंड्सचे नेचर क्लब सदस्य यशश्री उपरिकर,ओंकार चाचेरे, पंकज देशमुख, श्रीनय चाचेरे,मंथन चाचेरे, रेहान चाचेरे,ओंकार आगलावे,आराध्या आगलावे,ग्लोबल नेचर क्लबचे पूर्वा बहेकार,अथर्व बहेकार,रुणाली निंबेकर, रोहिणी भैसारे,आकांशा वाघमारे, अभिज्ञान वाघमारे, प्रित गजभिये,समृध्दी खेडीकर, ऋतुजा गहाने,सेवानिवृत्त मेजर ऋषि वंजारी त्याचबरोबर ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी अशोक वैद्य ,अशोक नंदेश्वर, ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर व दिनकर कालेजवार या सर्वांनी पक्षी सप्ताहात आठही दिवस सहभाग नोंदवून सहकार्य केले.