प्रितम जनबंधु 

संपादक 

 

दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी फुले दाम्पत्य प्रतिष्ठाण आयटीआय – गोकुळनगर बायपास गडचिरोली येथे सर्व सामाजीक संघटनाच्या सहकार्याने महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन, शिक्षक दिन म्हणुन जिल्ह्यातील व बाहेरील भव्य लोकसमुदायाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मुरखळा येथील जनतेने सभास्थळापर्यंत सुंदर वेशभुषा करुन रॅली काढली. मा. इंदिराताई मोहुर्ले (आयपीएस संदिप मोहुर्ले यांच्या मातोश्री) हस्ते अभ्यासिका, वस्तीगृह, अशा बहुउद्देशीय फुले दाम्पत्य विचार भवनाचे लोकार्पण करण्यात आले. आराखडा तयार करणारे बांधकाम विभाग इंजि.मा.सुनिल दुर्गे व बांधकाम कंत्राटदार मा.संजय मुंगसुजी लोणारकर यांचे सहका-यांसह कृतज्ञताभावनेने शाल देऊन सत्कार करण्यात आला.

समाजामध्ये प्रबोधन करुन लोकजागृती घडविणा-या मान्यवरांचा दरवर्षी महात्मा फुले समाज शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो. यावर्षी मा.नागेश चौधरी सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

 

महापुरुषास प्रबोधनपर आदरांजली वाहुन मार्गदर्शकांनी उपस्थितांना खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले.

1) सत्कारमुर्ती मा.नागेश चौधरी, संपादक बहुजन संघर्ष नागपूर = बहुजन महापुरुषांना डावलुन स्वजातीच्या कर्तुत्वहीनांना प्रसिध्द करण्याचा धुर्तपणा मनुवाद्यांनी केला. तसेच नविन शैक्षणीक धोरण कसे विषारी आहे याबाबत सपत्नीक मार्गदर्शन केले.

 

2) उद्घाटक मा. ऑड. दिलीपभाऊ कोटरंगे, वणी = बहुजनांनी परंपरागत लादल्या गेलेली गुलामीची प्रतिके नाकारण्याचे व महापुरुषांनी दिलेले सार्वजनिक सत्यधर्मासारखे पर्याय स्विकारण्याचे आवाहन केले 

 

3) प्रमुख मार्गदर्शक मा.जावेद पाशा कुरेशी, नागपूर = महात्मा फुलेंच्या सांस्कृतीक राष्ट्रवाद व संघर्ष, वैचारीक वारसा यावर प्रकाश टाकला. वरच्या स्तरावर राजकारणी आपसात रोटीबेटी करतात मात्र सर्वसामान्यांना कस भडकवितात हे उदा. सह पटवुन दिले.

 

4) कार्यक्रम अध्यक्ष प्रा.डाॅ.दशरथ आदे, कुरखेडा = उच्चवर्णियांनी इतिहासामध्ये केलेल्या कावेबाजपणाची जाणिव ठेऊन भविष्यात सतर्क रहायला हवे, असे मार्गदर्शन केले.

 

            कार्यक्रमाचे संचालन गिरीष लेनगुरे व प्रास्ताविक भिमराज पात्रीकर यांनी केले. आभार किसन सोनुले यांनी मानले व फोटोग्राफी देवा फोटो स्टुडीयो यांनी पार पाडली.

 

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संघटनांच्या पदाधीका-यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास गडचिरोली तथा लगतच्या जिल्ह्यातील बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. उपस्थितांच्या स्नेहभोजनाची सोय श्रीमती विद्या सोनुले कॅटरींगतर्फे करण्यात आली होती.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com