कोणत्याही राजकीय पक्षांना व नोकरशाहीला आमचे घेणे देणे नाही,तर आम्ही त्यांची मिजास का ठेवायची?

कोणत्याही राजकीय पक्षांना व नोकरशाहीला आमचे घेणे देणे नाही,तर आम्ही त्यांची मिजास का ठेवायची?

        “IPS (पोलीस प्रशासन ), IRS( कर वसुली प्रशासन ) ,IAS ( सामान्य प्रशासन ), IFS ( परराष्ट्र व वनविभाग प्रशासन ), CJI ( सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय ), CAG ( देशाचा महानियंत्रक ), CEC ( मुख्य निवडणूक आयुक्त ), RBI ( रिझर्व बँक ऑफ इंडिया ), CBI ( केंद्रीय तपास पथक ), . आणि इतर सर्व सनदी अधिकारी प्रशासकीय विभाग. तसेच सर्वच राजकीय पक्ष…..

           वरील सर्वाना जर भारत देशाचे,स्वातंत्र्यवीरांचे,सर्वसामान्य जनतेचे,महापुरुषांच्या त्याग व बलिदानाचे महत्व आणि उपकाराची जाणीव न ठेवता, केवळ स्वार्थासाठीच स्वतःच्या शिक्षणाचा वापर करुन सर्वसामान्य जनतेला व देशाला त्यांच्या अज्ञान व हतबलतेचा लाभ उठविण्यासाठीच संविधानातील वाटापळवाटा शोधून संधी साधून..

” कर्जबाजारी आणि कुसंस्कृत “

        देश निर्माण करत असतील नव्हे त्यांचे मिशनच ते असेल तर, अशा राजकारण्यांना व सनदी अधिकाऱ्यांना वठणीवर आणायचे असेल आम्हाला संविधाणातूनच जागृत माणूस बनावे लागेल..

     कारण आपण कल्पनाही करू शकत नाही,की या सर्वांनी मिळून आमचा देश जगाच्या तुलनेत सर्वच क्षेत्रात गेल्या 75 वर्षात एवढा रसातळाला नेऊन ठेवलाय, की परकीय राजकीय आक्रमणकर्ते इंग्रज खूप चांगले होते हे म्हणण्याची वेळ आलेली आहे!

ज्या लोकशाहीवादी देशात येन केन प्रकारे मतदानाचा…..

 ” मूलभूत हक्क”

      जो हक्क जनतेला देशाचा सर्वांगीण गाडा चालवीन्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची पाच वर्षातून एकदाच संधी मिळते,तो हक्क,जनतेचा दिशाभूल करुन त्यांच्या अज्ञानाचा आणि हतबलतेचा लाभ उठवत हिरावून घेतल्या जातो.त्या देशाची अवस्थागुलामांचा देश ही अशीच असणारी आहे.

         ज्या सर्वोच्च न्यायालयातील बार कौन्सिलच्या निवडणुका पूर्वी याच EVM वर घेतल्या जात असतांना, केवळ एका वकिलाने या EVM वर आक्षेप घेतल्याबरोबर ताबडतोब तीला बाजूला करुन बॅलेट पेपरवर तेथील निवडणुका होत असतील,आणि इथे तर या EVM च्या विरोधात जनता रस्त्यावर उतरून सुद्धा ….

     तुमचा ( मुख्य निवडणूक आयोगाचा ) EVM चाच हट्ट का?

        बरं EVM हटले आणि बॅलेट पेपर आले म्हणजे सर्वकाही आलबेल झाले असं अजिबात नाही. हा उपाय म्हणजे गंभीर आजाराच्या विविध चाचण्या ( MRI, CT स्कॅन,) आहेत. तेंव्हाच गंभीर आजारावर उपाय करता येतो.

     या चाचण्या न करता रोगाचे निदान होणार नाही.म्हणून EVM हटवावे लागणार, नंतर संविधान जागृती करण्यासाठी भ्रष्टाचारातून देश कसा कर्जबाजारी होत गेला त्याचे समीक्षण करुन नीती भ्रष्टाचाराच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया करुन कायमचे घालवून येणाऱ्या भावी पिढीला व देशाला मोकळा श्वास घेता येईल…

       त्यासाठी या EVM ला हटविण्यासाठीच निदान येणाऱ्या 2029 च्या लोकसभा निवडणुकीत तरी हटवावेच लागेल…

       त्यासाठी संविधान जनजागृती होणे अत्यंत काळाची नव्हे तर आमची गरज आहे. तेंव्हाच आम्ही जिवंत असल्याचे सिद्ध होईल…

           जागृतीचा लेखक

              अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..