छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय,आसेगाव पूर्णा येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक

             छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय,आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक ३१ऑक्टोबर २०२३ रोजी भारताचे लोहपुरुष उपपंतप्रधान व गृहमंत्री स्वर्गीय वल्लभभाई पटेल यांची १४८ वी जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. तसेच भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांची ३९ वी पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी करण्यात आली. सुरुवातीला प्रतिमेचे पूजन व हरार्रपण करण्यात आले व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.

           या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.भारत कल्याणकर याप्रसंगी म्हणाले की, भारत छोडो आंदोलनात सरदार वल्लभाई पटेल हे आघाडीवर होते त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसघीकारणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी “सरदार” ही उपाधी दिली.

             भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपप्रंतप्रधान झाले. फाळणी नंतर उफळलेल्या हिंसाचाराचा नंतर शांती स्थापने करता त्यांनी कार्य केले. मुसदेगिरी सैन्य बळाचा वापर करून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.

             आर्यन लेडी भारताच्या प्रथम महिला स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी या सुरुवातीपासून स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होत्या. विविध विषयात रुची ठेवणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधी आयुष्याला एक निरंतर प्रक्रियेच्या पाहत असे ज्यामध्ये काम आणि आवड हे त्यांचे वेगवेगळे पैलू आहे.ज्यांना कोणत्याही प्रकारे विभिन्न करता येत नाही किंवा त्यांचे वेगवेगळ्या श्रेणीत वर्गीकरण करता येत नाही त्यांनी आपल्या जीवनात अनेक क्षेत्रात लैवकिक प्राप्त केला.

           गुंगी गुडिया म्हणणाऱ्यांचा स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर असे निर्णय घेतले ज्यांचे प्रतिध्वनी जगभर पोहचले. श्रीमती इंदिरा गांधींनी बँकेचे लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी बँकेचे राष्ट्रीयीकरण केले. असे प्रतिपादन केले.

            या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रवीण सदार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.रवींद्र इचे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष काळे यांनी केले. आभार विक्की पवार यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. अतुल चराटे, प्रा. सागर भुसारी, प्रा. अक्षय मोने शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.