मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी यशस्वी वाटचाल… — मनोज जरांगे पाटलांची भूमिका रास्त व सनद मार्गाची… — लत व त्यातंर्गत सवयीलाच मनोज जरांगे पाटलांनी फटकारले..‌ — अन्यथा भाजपाला मराठा समाज कधीच माफ करणार नाही..

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

              भारत देशातील सर्व समाज घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधीत्व मिळावे हेच भारतीय संविधान सांगते आहे.

            म्हणूनच देशातील सर्व समाज घटकांचे हित जपण्यासाठी व सदैव सुरक्षा करण्यासाठी,”केंद्र सरकारला विशेष अधिकार,”भारतीय संविधानाने बहाल केले आहेत.आणि कायदेशीर अडचण गेल्यास राज्य सरकार त्यांना मदत करेल किंवा त्या संबंधाने राज्य सरकार स्वतःहून पुढाकार घेईल असे भारतीय संविधानात स्पष्ट निर्देशित केले आहे.

           वरील प्रमाणे,महाराष्ट्र राज्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असल्याने या समाजाचे कुठल्याही प्रकारचे अहित होणार नाही या संबंधाने राज्य सरकारने वेळ न दवडता स्वतःहून पुढे येत मराठा आरक्षणा बाबत सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून केंद्र सरकारकडे तसा पाठपुरावा करणे आवश्यक होते व आहे.

              मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जूना असतांना महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी आतापर्यंत गाफील का म्हणून राहिले? व का म्हणून गाफील राहात आहेत? हे अचूकपणे मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आले आहे.

             महाराष्ट्र राज्याचे सत्ताधारी हे,”महाराष्ट्रातील,”बाकीच्या समाज घटकांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून कसे भरकटत ठेवतात व कसे वेळ मारुन नेतात,हे मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आले आहे.तद्वतच बाकीच्या समाजाचे नेते स्वतःच्या समाजासाठी काय करतात ते करोत,काय भूमिका घेतात त्या घेवोत,मात्र त्यावर आपण भाष्य करायचे नाही हे त्यांच्या संघर्षातील यशाचे खरे गमक आहे.

               इतर समाज घटकांप्रमाणेच,”मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर,”मराठा समाजाला भरकटत ठेवायचे, आणि सातत्याने वेळ मारुन न्यायची,”अशा पध्दतीचे कुटनिती अंतर्गत धोरण महाराष्ट्र राज्यातील सत्ताधाऱ्यांनी व राजकारण्यांनी अवलंबिले आहे आणि अशा वेळकाढू कुटनिती धोरणामुळे मराठा समाजाचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व प्रशासनीक नुकसान होणार आहे हे सुध्दा मनोज जरांगे पाटीलांनी अचूकपणे हेरले आहे आणि मराठा समाजाच्या बाबतीत तशा प्रकारची परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागली आहे.

           यामुळेच मराठा समाजाच्या हितासाठी व संरक्षणासाठी त्यांनी आपल्या आंदोलनाची योग्य व उत्तम दिशा ओळखली आणि आमरण उपोषणान्वये मराठा समाज बांधवांना लवकर आरक्षण मिळवून द्यायचे असे मनोज जरांगे पाटीलांनी ठरवले.

           तसेही इतर व स्वसमाजहितासाठी आणि समाज संरक्षणासाठी संघर्ष करण्यासंबंधाने तर भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकांना मुलभूत अधिकार दिलेला आहे.मनोज जरांगे पाटील समाजाच्या हितासाठी आमरण उपोषण करीत आहेत हा त्यांचा न्यायिक हक्क आहे.

               मराठा आरक्षणाच्या बाबतीत सातत्याचे राजकारण व सत्ताधाऱ्यांचे नेहमीचे वेळकाढू धोरण,हे मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आल्याने त्यांनी सकल मराठा समाजाच्या हितासाठी व संरक्षणासाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला यात त्यांचा अजिबात दोष नाही किंवा त्यांची बेकायदेशीर कृती नाही आणि बेकायदेशीर भूमिकाही नाहीत.

           इमानदार व सत्य नेतृत्व हे शासन-प्रशासनाला हादरे देतोय,कामाला लावतोय हे मनोज जरांगे पाटलांच्या कुशल नेतृत्वाने दाखवून दिले आहे.

              आरक्षण मुद्द्यान्वये मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या हितासाठी व संरक्षणासाठी तसूभरही हटायला तयार नाहीत.अर्थात आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय बदलायला ते अजिबात तयार नाहीत.म्हणूनच मनोज जरांगे पाटील हे उत्तम योध्दा आहेत व योग्य असे संघर्षक नितीवान नेतृत्व आहेत असे मानण्यास हरकत नाही.

          याचबरोबर आरक्षणातंर्गत समाज हितासाठी व संरक्षणासाठी जिवाची बाजी पणाला लावणारे मनोज जरांगे पाटील हे कणखर असे चारित्र्यसंपन्न व्यक्तीत्व आहेत हे लक्षात येते आहे.

***

भाजपा…

          मनोज जरांगे पाटलांना आमरण उपोषण काळात काही व्हायला नको.”अन्यथा मराठा समाज भाजपाला कधीच माफ करणार नाही..

             तसेही उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते माझ्या हातात महाराष्ट्र राज्याची सत्ता द्या,६ महिन्याच्या आत आरक्षण मागणाऱ्या सर्व समाज घटकांना आरक्षण देतोय.

         त्यांनी आपल्या शब्दाला जागत मराठा व धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्यायला पाहिजे होते.त्यांनी का म्हणून मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी विलंब केलाय?हा प्रश्न तर उदभवतोच..

          उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस यांनी मराठा व इतर समाजाच्या आरक्षणा बाबतीत वेळकाढूपणा केलाय हे सुध्दा लपून राहिलेले नाही.

           आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री ना‌.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.भुतकाळातील व वर्तमान काळातील सत्ताधाऱ्यांच्या वेळकाढू भुमिका बघता त्यांच्यावर विश्वास दाखवणे उचित नाही हा मनोज जरांगे पाटलांचा निर्णय बरोबर आहे हे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस यांनी स्विकारले पाहिजे.

***

लत…

      राजकारण्यांना व सत्ताधाऱ्यांना वेळकाढू भुमिकांची लत लागली आहे आणि या लती अंतर्गत नागरिकांना घुमवण्याची सवय जडली आहे.या लतीला व लत अंतर्गत सवयीलाच मनोज जरांगे पाटलांनी जोरदार फटका हाणला आहे.

   ***

वेळकाढूपणा..?

           राजकारण्यांच्या व सत्ताधाऱ्यांच्या वेळकाढू भुमिकांमुळे सर्व समाज घटकांचे अतोनात नुकसान झाले आहे व होणार आहे हे उघड आहे.

               मात्र,त्यांची अशी कार्यपद्धत सर्व समाज घटकांवर अन्याय व अत्याचार करणारी आहे,सर्व समाज घटकांची फसवणूक करणारी आहे हे वास्तव ते अस्विकार करीत असले तरी त्यांची बनवाबनवी फार काळ टिकणारी नाही.