सतिश कडार्ला,

जिल्हा गडचिरोली

 गडचिरोली,(जिमाका)दि.01: महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम,2013 च्या कायदयाची परिणामकारक व योग्य अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दिनांक 28 जून 2022 अन्वये विभागीय आयुक्त (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरील जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती (DivPIMC Divisional Programme Implementation and Monitoring Committee DivPIMC) स्थापन करण्यात आलेली आहे.

    सदर समितीमध्ये एका विभागीय समन्वयकाची नेमणूक करावयाची आहे. त्यासाठी जादुटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलन या क्षेत्रात काम करणाऱ्या (किमान पाच वर्ष अनुभव असलेल्या) इच्छुक व्यक्तींनी दिनांक 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग,नागपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,शासकीय आय.टी.आय. समोर, श्रध्दानंदपेठ,नागपूर-440022 या पत्यावर अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त,डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com