वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.१/११/२०२२ रोजी विश्रामगृह वाशिम येथे शालेय धोरणाबाबत युवकांसोबत बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये नॅशनल युथ पॉलिसी तसेच महाराष्ट्र युथ पॉलिसी बाबत युवकांसोबत चर्चा करण्यात आली.चर्चेमध्ये प्रत्येक युवकांना त्यांच्या अधिकारासाठी नॅशनल युथ पॉलिसी आणि महाराष्ट्र युथ पॉलिसी माहिती समजावून घेणे गरजेचे आहे.तसेच शालेय धोरणा बाबत युवकांसोबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये शासनाने जे शालेय धोरण परिपत्रक आणले आहे.त्या संदर्भामध्ये शालेय धोरणाचे परिपत्रक युवकांना समजावून सांगण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील 133 शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे.या निर्णयाबाबत युवकांसोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीचे आयोजन अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून मा.सतीश भगत मा. प्रदीप पट्टेबहादूर आणि वाशिम जिल्ह्यातील आणि तालुक्यातील युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत