गरजू रुग्णांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त रक्तदान घडवून आणण्यास मी सदैव प्रयत्नशील राहीन :- शिवसेना उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब काळे… — अण्णासाहेब काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद,तर यामध्ये शेकडो रक्तदात्यांचा सहभाग…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील,शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख माजी सरपंच अण्णासाहेब काळे, यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त रक्तदान शिबिराला चांगलाच प्रतिसाद मिळाला,शेकडो रक्तदात्यांचा यामध्ये सहभाग, प्रत्येक रक्तदात्यास नाष्टा, चहा, बिस्किटे, केळी व प्रमाणपत्रा सहित एक भेटवस्तू , पाण्याचा जार, टी-शर्ट, किंवा जर्किंग ,या तीन पैकी एक भेट वस्तू देण्यात आली.

            रक्तदान शिबिराचे प्रमुख आयोजक अण्णासाहेब काळे मित्रपरिवार यांच्या वतीने घेण्यात आले.

          शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे संगम तालुका माळशिरस येथील उद्योजक व आमदार राम सातपुते यांचे खंन्दे समर्थक, आणि प्रगतशील बागायतदार सागर इंगळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

         याप्रसंगी अण्णासाहेब काळे यांचा वाढदिवस केक कापून, शाल श्रीफळ व फेटा बांधून सन्मानित करण्यात आला.

          अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त अण्णासाहेब काळे बोलत आसताना म्हणाले की लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीत माझा वाढदिवस साजरा होत असताना मला याबद्दल मोठा आनंद होत आहे. रुग्णालयातील गरजू लोकांच्या जीवनासाठी रक्ताची गरज आसते. म्हणूनच या अनुषंगाने माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

          गरजू रुग्णांना रक्तासाठी कोणतीही अडचण येऊ नये, ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त रक्तदान घडवून आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन अण्णासाहेब काळे यांचे वाढदिवसा निमित्त उदगार.

            या कार्यक्रमासाठी प्रमुख, नरहरी काळे, सागर इंगळे, विलास ताटे, सरपंच नितीन सरवदे, संतोष मोरे, जगदीश सुतार, विजय सरवदे, दत्ता कवडे, चंद्रकांत सरवदे, प्रशांत बादले, तानाजी जगदाळे, दशरथ राऊत, प्रकाश काळे, विठ्ठल देशमुख, पप्पू गोसावी, सचिन कदम नाथाजी मोहिते, नरहरी इंगळे ,कल्याण इंगळे, धनंजय पवार, विठ्ठल धोत्रे, मदन सरवदे, इरफान शेख, शंकर राऊत, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

           शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब काळे यांचा अनेक मान्यवर व सरपंच उपसरपंच आजी-माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष व सर्वच पंच क्रोशीतील ग्रामस्थ यांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त अण्णासाहेब काळे यांचा सन्मान करण्यात आला.  

चौकट

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख सीमा कल्याणकर, सह सर्व कार्यकर्त्यांनी अण्णासाहेब काळे यांना शुभेच्छा…