पारशिवनी तालुका येथे विधानसभा निवडणुकी संदर्भात तहसिल कार्यालयात बैठक संपन्न…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी :- पारशिवनी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात रामटेक चे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विधानसभा निवडणुकीय संदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधीकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. 

        पारशिवनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी , पर्यवेक्षक , नायब तहसीलदार यांची निवडणुकीय संदर्भात विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदाता पर्ची घरोघरी वाटणे अनिवार्य आहे.

          तसेच 40 टक्के असणाऱ्या दिव्यांग मतदारांना तसेच 85 वर्षांवरील मतदारांना होम वोटींग करीता पोस्टल बॅलेट प्राप्त करुन देण्याकरीता सहकार्य करणे अपेक्षीत आहे. त्याचबरोबर नव मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती व मतदान यादीतील नावे वगळण्याची कार्यवाही सध्या सुरू असुन आपल्या गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे असणाऱ्या यादीतुन नाव असल्याबाबत खात्रीशीर माहिती घ्यावी.

            असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रियेश महाजन यांनी या बैठकीत केली.

           यावेळी नायब तहसीलदार रमेश पागोटे,नायब तहसीलदार प्रकाश हारगुडे, रामटेकचे नायब तहसिलदार महेश कुलदिवार , निवडणुक विभागाचे तेजराम राठोड, अरविंद मेश्राम, हर्षदा रोडगे, सर्व मंडळ अधिकारी सर्व तलाठी प्रामुख्याने उपस्थीत होते.