युवराज डोंगरे
उपसंपादक
येत्या काही दिवसात राज्यात विधानसभेच्या निवडणूकीचा बिगुल वाजणार आहे. दर्यापूर मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखिव असल्याने या मतदार संघात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होत आहे. या मतदार संघात महिला उमेदवार म्हणून सौ काजल गवई या उभ्या राहणार असल्याचे त्यांनी आज दि. 1 ऑक्टोबर रोजी दर्यापूर येथे विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदे स्पष्ट केले.
दर्यापूर मतदार संघात बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याकरीता रोजगानिर्मिती,एम आय डी सी, महाराष्ट्रातील आमदारांचे पेन्शन बंद करणे, महिलांना आर्थिक रित्या सक्षम करणे, युवा शक्तीला आर्थिक रित्या सक्षम करणे,शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा.
महिलांवरील होत असलेल्या अन्यायाला प्रतिकार, एस टी कर्मचारी यांना योग्य पगार वाढ करणे, शोषित अन्याय ग्रस्त महिलांना न्याय देणे, दर्यापूर विधानसभा अंतर्गत असलेल्या परिसराचा सर्वांगिक विकास करणे, शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना स्कॉलरशिप देण्यात यावी.
महिलांना सोनोग्राफी व्यवस्था करणे, दर्यापूर मधील बंद पडलेली सूतगिरणी कश्या प्रकारे चालू करता येईल आणि त्या द्वारे तालुक्यातील बेरोजगारी दूर होऊ शकते त्यासाठी प्रयत्न करणे, तालुक्यातील खेडेगावात जाणारे नादुरुस्त रस्ते शेतातील पाणंद रस्ते होण्यासाठी प्रयत्न करणे,विद्यार्थ्यांच्या शाळेतील बस सेवा सुविधा पूर्ण करणे या गोष्टीकडे भर राहील असे मत त्यांनी मांडले.
यावेळी नागेश गावंडे विद्रोही, हर्षल हिवराळे, विकास रायबोले, प्रमोद खंडारे, सहादेव तायडे, अक्षय गावंडे, नागोराव वानखडे, अनिल वानखडे, प्रमोद नेर, सागर शेळके, विजय राणे उमेश इंगळे, आदी उपास्थित होते.