जनसंवाद परीवर्तन यात्रा….

ऋषी सहारे

    संपादक

कुरखेडा :- परिवर्तन यात्रा करून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस चे वतीने परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे.

          दिनांक- 27 सप्टेंबर 2024 पासून सुरुवात केली असून कुरखेडा तालुक्यातील जनसंवाद परिवर्तन यात्रेचा पहिला दिवस अरततोंडी, देऊळगव, गेवर्धा, खेडेगाव आणि चिखली या गावी यात्रा काढण्यात आली.

           मौजा अरततोंडी महादेव देवस्थान ता. कुरखेडा येथून सर्व ईच्छूक उमेदवारांच्या उपस्थित कुरखेडा तालुका काँग्रेस अध्यक्ष- जिवन नाट, माजी उपाध्यक्ष जंयत हरडे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तूलावी व काँग्रेस कार्यकर्ता माधवराव गावळ यांच्या नेतृत्वाखाली परीवर्तन यात्रा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सर्व ईच्छूक उमेदवार उपस्थित होते.